Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींसाठी दिलासादायक बातमी; e-KYC संदर्भात मंत्री आदिती तटकरेंची मोठी घोषणा

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींसाठी दिलासादायक बातमी; e-KYC संदर्भात मंत्री आदिती तटकरेंची मोठी घोषणा

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेबाबत एक महत्त्वाची आणि दिलासादायक अपडेट समोर आली आहे. e-KYC मधील तांत्रिक अडचणींमुळे अनेक लाभार्थी महिलांना डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळालेला नाही. e-KYC करूनही पैसे जमा न झाल्याने राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये महिलांनी आंदोलन व मोर्चे काढत नाराजी व्यक्त केली होती.

या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला असून, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सोशल मीडियावरून याबाबत माहिती दिली आहे. महिलांच्या अडचणी लक्षात घेऊन e-KYC प्रक्रियेत सुलभता आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले की, महाराष्ट्रातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी तसेच त्यांच्या आरोग्य व पोषणात सुधारणा करण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवली जात आहे. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी 31 डिसेंबर 2025 पर्यंत e-KYC करण्याची मुदत देण्यात आली होती. मात्र, e-KYC करताना काही लाभार्थ्यांकडून चुकीचा पर्याय निवडला गेल्याचे निदर्शनास आले आहे.

यामुळे आता योजनेच्या निकषांनुसार संबंधित लाभार्थी महिलांची क्षेत्रीय स्तरावर प्रत्यक्ष पडताळणी (Physical Verification) करण्यात येणार आहे. ही पडताळणी अंगणवाडी सेविकांमार्फत केली जाणार असून, याबाबत राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत.

या निर्णयामुळे महिलांना ऑफलाइन पद्धतीने e-KYC पूर्ण करण्याची संधी मिळणार आहे. प्रत्यक्ष पडताळणीनंतर लाभार्थी महिलांचे e-KYC पूर्ण होईल आणि त्यानंतर थकलेले तसेच पुढील हप्त्याचे पैसे त्यांच्या खात्यात जमा होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

 

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!