Today मंगळवार, 28th जुलै 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

मुंबईत देवनार परिसरात निवडणूक भरारी पथकाची कारवाई; 2 व्हॅनमधून 2 कोटी 33 लाखांची रोकड ताब्यात

मुंबईत देवनार परिसरात निवडणूक भरारी पथकाची कारवाई; 2 व्हॅनमधून 2 कोटी 33 लाखांची रोकड ताब्यात

Mumbai : मुंबईच्या देवनार परिसरातून निवडणूक भरारी पथकाने 2 व्हॅनमधून 2 कोटी 33 लाखांची रोकड ताब्यात घेतली आहे. आता ही रक्कम नेमकी कुठून आली याचा तपास केला जात आहे. राज्यातील महानगर पालिकांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या आचारसंहिता सुरू आहे. त्यामुळे राज्यातील परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी निवडणूक भरारी पथके नेमण्यात आलेली आहेत. अशाच एका भरारी पथकाने मुंबईच्या देवनार परिसरातून 2 व्हॅनमधून 2 कोटी 33 लाखांची रोकड ताब्यात घेतली आहे. त्यामुळे मुंबईत खळबळ उडाली आहे. ही रक्कम कशासाठी आणि कुठून आली याबाबत वेगवेगळे प्रश्न उपस्थित होत आहेत. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

निवडणूक भरारी पथकाची कारवाई

निवडणूक भरारी पथकाने मुंबईच्या देवनार परिसरातून 2 व्हॅनमधून 2 कोटी 33 लाखांची रोकड ताब्यात घेतली आहे. ही रोकड ATM मध्ये भरण्यासाठी नेली जात असल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र या रकमेबाबत संशय असल्यामुळे या पैशांची माहिती आयकर विभागाला देण्यात आली असून पुढील तपास आयकर विभागाकजे सोपवण्यात आला आहे. सध्या ही रोकड देवनार पोलिसांकडे कस्टडी म्हणून ठेवण्यात आली असून ही रोकड कुठून कुठे नेली जात होती याची माहिती घेतली जात आहे.

आयकर विभाग चौकशी करणार

समोर आलेल्या माहितीनुसार, पोलिसांना या रकमेबाबत संशय आहे. सध्या निवडणूक असल्यामुळे पैशांचा मोठ्या प्रमाणात वापर होण्याची शक्यता आहे. यावर बारीक नजर ठेवली जात आहे. संशयित वाहनांची कसून चौकशी केली जात आहे. अशाच एका कारवाईत ही रक्कम आढळली आहे. या पैशांची पुढील चौकशी आयकर विभाग करत आहे. देवनार पोलिसांनी या घटनेची नोंद स्टेशन डायरीत केली असून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.

राज्यातील विविध ठिकाणी नाकाबंदी

मुंबईसह राज्याच्या विविध भागात सध्या भरारी पथके तैनात करण्यात आलेली आहे. तसेच प्रमुख शहरांच्या प्रवेशद्वारावर नाकाबंदी करण्यात आली असून शहरात प्रवेश करणाऱ्या वाहनांची कसून चौकशी केली जात आहे. याचे कारण म्हणजे मतदानाच्या आणि प्रचाराच्या काळात राजकीय पक्षांकडून मोठ्या प्रमाणात पैशांचा वापर होण्याची शक्यता आहे. मतदारांना पैशांचे आमिष दाखवले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील विविध ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली असून अशा गोष्टींना आळा घालण्याचा प्रयत्न केला जात आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!