Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

मुंबईतील घरविक्री घटली! गेल्या वर्षीपेक्षा 14% कमी; ऑक्टोबरमध्ये फक्त 11,200 घरांचे सौदे

मुंबईतील घरविक्री घटली! गेल्या वर्षीपेक्षा 14% कमी; ऑक्टोबरमध्ये फक्त 11,200 घरांचे सौदे

मुंबई: मुंबईमध्ये यंदा ऑक्टोबर महिन्यात 11 हजार 200 मालमत्तांची विक्री झाली असून, गेल्या वर्षी याच महिन्याच्या तुलनेत विक्रीच्या या प्रमाणात 14 टक्क्यांची घट नोंदली. एकीकडे मालमत्ता विक्रीमध्ये घट झालेली असताना याचा परिणाम मुद्रांक शुल्काच्या रूपाने मिळणाऱ्या महसुलातही घट होण्याच्या रूपाने दिसून आला.

गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये 13 हजार 200 मालमत्तांची विक्री झाली होती. त्याद्वारे राज्य सरकारला 1205 कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला होता. यंदाच्या वर्षी महसुलात 17 टक्क्यांची घट होत 1004 कोटी रुपयांचा महसूल मिळाला. यंदा ऑक्टोबरमध्ये दिवाळी होती. वास्तविक, या सणामध्ये गृहविक्रीला चालना मिळणे अपेक्षित होते.केवळ गेल्या वर्षीच्याच नव्हे, तर गेल्या महिन्याच्या अर्थात सप्टेंबर 2025 च्या महिन्याच्या तुलनेतदेखील ऑक्टोबर 2025 या महिन्यात मालमत्ता विक्रीमध्ये 7 टक्क्यांची घट झाली. सप्टेंबर महिन्यात मुंबईत 12 हजार 70 मालमत्तांची विक्री झाली होती.

मात्र, ज्या मालमत्तांची विक्री झाली आहे त्यामध्ये 80 टक्के मालमत्ता या निवासी स्वरूपाच्या असून, 20 टक्के मालमत्ता या कार्यालयीन, तसेच व्यावसायिक स्वरूपाच्या आहेत. हा ट्रेंड कायम राहिल्याचे दिसून आले आहे. चालू वर्षात मुंबईत जानेवारी ते ऑक्टोबर या कालावधीमध्ये आतापर्यंत एकूण 1 लाख 23 हजार 141 मालमत्तांची विक्री झाली.

 

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!