Today सोमवार, 15th जून 2026
Breaking News
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

गौरी गर्जे मृत्यूप्रकरणात पंकजा मुंडेंची भावनिक प्रतिक्रिया; म्हणाल्या, ‘कोणाच्या अतिवैयक्तिक जीवनात काय चालू असतं हे अनाकलनीय ‘

गौरी गर्जे मृत्यूप्रकरणात पंकजा मुंडेंची भावनिक प्रतिक्रिया; म्हणाल्या, ‘कोणाच्या अतिवैयक्तिक जीवनात काय चालू असतं हे अनाकलनीय ‘

मुंबई: मंत्री पंकजा मुंडे यांच्या स्वीय सहाय्यक अनंत गर्जे यांच्या पत्नीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. वरळीतील राहत्या घरी अनंत गर्जे यांच्या पत्नी डॉक्टर गौरी पालवे यांनी गळाफास घेऊन जीवन संपविले आहे. अनंत गर्जे यांचे एका महिलेशी संबंध होते. त्यातूनच गौरी पालवे-गर्जे हिने आत्महत्या केल्याचा आरोप नातेवाइकांचा आहे. या प्रकरणी अनंत गर्जेविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणात आता पंकजा मुंडे यांची अधिकृत प्रतिक्रियासमोर आली आहे.

पीए अनंतचा फोन आला-पंकजा मुंडे

पंकजा मुंडे यांनी माध्यमांसाठी प्रेस नोट काढली आहे. त्यात त्या म्हणतात, 22 नोव्हेंबर 2025 रोजी संध्याकाळी 6.30 ते 6.45 वाजण्याच्या सुमारास माझा पीए अनंतचा फोन माझ्या दुसऱ्या पीएच्या फोनवर आला. तो खूप रडत होता . पत्नीने आत्महत्या केल्याचे अत्यंत आक्रोशाने त्याने मला सांगितले. ही गोष्ट माझ्यासाठी ही खूप धक्कादायक होती, अशी भावना पंकजा मुंडे यांची आहे.

पोलिसांच्या कुठल्याही कारवाईमध्ये कसूर राहू नये

पोलिसांच्या कुठल्याही कारवाईमध्ये कसूर राहू नये व त्यांनी योग्य तपास करुन या विषयाला हाताळावे असे माझे म्हणणे आहे. तसे मी पोलिसांना देखील सांगितले आहे. गौरीच्या वडीलांशीही मी बोलले, ते प्रचंड दु:खात आहेत हे मी समजू शकते. अश्या घटना जीवाला चटका लावून जातात आणि मनाला सुन्न करतात. कोणाच्या अति वैयक्तिक जीवनात काय चालू असतं हे अनाकलनीय आहे. अचानक धक्कादायक अशी ही घटना घडली असल्याने मलाही अस्वस्थ वाटत आहे, असे पंकजा मुंडे यांनी म्हटलंय.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!