Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Kishori Pednekar : महापौर पंतप्रधान-मुख्यमंत्र्यांपेक्षा मोठ्या झाल्या का? किशोरी पेडणेकरांचा रितू तावडेंवर जोरदार हल्लाबोल

Kishori Pednekar : महापौर पंतप्रधान-मुख्यमंत्र्यांपेक्षा मोठ्या झाल्या का? किशोरी पेडणेकरांचा रितू तावडेंवर जोरदार हल्लाबोल

Kishori Pednekar on Ritu Tawde : मुंबई महापालिकेच्या नव्या महापौर रितू तावडे (Ritu Tawde) यांच्या अधिकृत गाडीवर लावण्यात आलेल्या लाल-निळ्या फ्लॅश दिव्यांमुळे सोशल मीडियावर आणि राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. केंद्र सरकारने मे २०१७ मध्ये व्हीआयपी संस्कृती रोखण्यासाठी सामान्य सरकारी वाहनांवर लाल दिवे वापरण्यास बंदी घातली होती. मात्र, महापौरांच्या नव्या गाडीवर हे दिवे दिसल्याने नियमांचे उल्लंघन झाल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. भाजप सत्तेत आल्यानंतर पुन्हा व्हीआयपी संस्कृतीने डोके वर काढल्याचा दावाही केला जातो.

किशोरी पेडणेकर म्हणाल्या काय?
मुंबई महापालिकेच्या विरोधी पक्ष नेत्या आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी ‘एक्स’ (पूर्वीचे Twitter) वर पोस्ट करून रितू तावडे यांच्यावर ताशेरे ओढले. त्यांनी म्हटले “नियमांना #ब्रेक आणि महापौरांच्या गाडीला #झगमगाट, मुंबईत व्हीआयपी संस्कृतीची पुन्हा एन्ट्री? दोन दिवसांपूर्वीच महापौर मॅडम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढलेल्या जीआरला दिलेल्या सूचनेला हरताळ फासला. आता तर केंद्र सरकारने दिलेल्या निर्णयाला हरताळ फासला आहे.

व्हीआयपी संस्कृती पंतप्रधान मोदी, केंद्र सरकार यांनी संपवली होती. पण, मुंबईच्या महापौरांना व्हीआयपी संस्कृतीचा मोह टाळता आला नाही. पंतप्रधान मोदी केंद्र सरकारचे निर्णय… महापौर पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांपेक्षा मोठ्या झाल्या का?”

किशोरी पेडणेकर यांनी या मुद्द्यावरून भाजप सरकार आणि महापौर यांच्यावर नियमांचे उल्लंघन आणि व्हीआयपी संस्कृती पुनरुज्जीवनाचा आरोप केला आहे.

मिलिंद नार्वेकरांची प्रतिक्रिया

ठाकरे गटाचे आमदार मिलिंद नार्वेकर यांनीही ‘एक्स’वर पोस्ट करून म्हटले की, “नवनिर्वाचित महापौरांच्या विरोधात नक्की काय चाललंय?” त्यांनी महापौरांच्या घड्याळ, गाडी आणि वक्तव्यांवरून होणाऱ्या वादांकडे लक्ष वेधले आणि भाजपमधील अंतर्गत गटबाजी किंवा धूसफूस असल्याचा संशय व्यक्त केला.

वाद वाढल्यानंतर महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले की, महापौरांच्या गाडीवरील लाल-निळे दिवे दोन दिवसांपूर्वीच काढून टाकण्यात आले आहेत. नियमांचे पालन करण्यासाठी हे पाऊल उचलले गेले. तसेच, महापालिकेतील इतर काही महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांच्या वाहनांवरही असे दिवे बसवले गेले होते, पण निदर्शनास आल्यानंतर सर्व दिवे हटवण्यात आले. सध्या महापौरांच्या वाहनावर कोणतेही विशेष दिवे नाहीत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!