Today मंगळवार, 28th जुलै 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर…; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट

निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर…; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट

मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे, शिवसेना उबाठा गटाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे शरद पवार यांनी आज मुंबईत मतचोरीविरोधात सत्याचा मोर्चा काढला आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. सक्षम नावाच्या अॅपवरून माझ्या नावाने खोट्या नंबरवरून निवडणूक आयोगाकडे अर्ज केला गेला. व्हेरिफिकेशनसाठी हा अर्ज केला होता. माझ्यासह माझ्या कुटुंबाची चारही नावे मतदार यादीतून वगळण्याचा हा डाव असल्याचा मला संशय आहे, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला.

राज ठाकरे यांनी पुरावेच दिले आहेत. आपला पक्ष चोरला, नाव चोरले, वडील चोरायचा प्रयत्न केला. आता हेही कमी नाही म्हणून मतदार चोरी करायचा प्रयत्न केला गेला आहे. महाराष्ट्र देशाला दिशा दाखवतो. सर्वांना आवाहन करतो की, सर्वांनी मतदारयादीतील नावे तपासा. मुख्यमंत्र्यांना आव्हान देतो की, काय तो पर्दाफाश कराच. मुख्यमंत्र्यांनीही मान्य केले, की मतचोरी होतेच आहे, असे ठाकरे म्हणाले.

दोन दिवसांपूर्वी निवडणूक आयोगाचे अधिकारी मातोश्रीवर आले होते. मला विचारतात की, हा नंबर तुमचा आहे का, मी खोटा असल्याचे त्यांना सांगितले. यावर ते तुम्हाला अजून काही सांगायचे आहे का असे त्यांनी विचारले. मी म्हणालो तुम्ही आलात माझ्याकडे, मला काय ते सांगा, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

आम्हालाही निवडणुका हव्या आहेत. आम्ही यांना लोकशाहीच्या मार्गाने ठोकण्यासाठी आसुसलेले आहोत. प्रामाणिकपणे आम्ही सर्व मार्ग अवलंबत आहोत. न्यायालयात तरी न्याय मिळतो की नाही याची परीक्षा होणार आहे. मतचोर दिसेल, तिथे त्यांना फटकवा. परत सांगतो, आज ही सगळी एकजूट झालेली आहे. अॅनाकोंडा बसलेला आहे. जशी निवडणूक येईल, तशी दडपशाही सुरू होईल. हे सगळे पुरावे घेऊन आम्ही न्यायालयात जाणार आहोत. निवडणूक आयोग लाचार झालेला आहे. शिवसेनेची केस सर्वोच्च न्यायालयात सुरुच आहे, तुमच्या मनगटात ताकद आहे. आम्ही तुमच्यासाठी एकत्र आलो आहोत. दोन भाऊ एकत्र आले, आता झाले असे वाटून घेऊ नका. महाराष्ट्राने आवळलेली मूठ असलेला फोटो मतचोरांना पाठवा, असे ठाकरे म्हणाले.

 

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!