Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Gold and Silver : सोनं-चांदीचे भाव आणखी कोसळणार? केंद्र सरकारच्या निर्णयामुळे सर्वसामान्यांना दिलासा?

Gold and Silver : सोनं-चांदीचे भाव आणखी कोसळणार? केंद्र सरकारच्या निर्णयामुळे सर्वसामान्यांना दिलासा?

Gold and Silver : सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारने सोने आणि चांदीच्या आयात किंमतीत कपात करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला असून, त्यामुळे येत्या काळात सोने-चांदीचे दर कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात दर उच्चांकावर असतानाही सरकारने हा निर्णय घेतल्याने ग्राहकांना दिलासा मिळण्याची चिन्हं आहेत.

केंद्रीय प्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाने (CBIC) जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, सीमाशुल्क ठरवण्यासाठी वापरली जाणारी मूळ आयात किंमत कमी करण्यात आली आहे. याचा थेट परिणाम देशांतर्गत बाजारातील सोन्या-चांदीच्या दरांवर होऊ शकतो.

सोनं-चांदी किती स्वस्त होणार?

सोन्याची मूळ आयात किंमत डॉलर ५० ने कमी करून डॉलर १५१८ प्रति १० ग्रॅम करण्यात आली आहे. तर चांदीची मूळ आयात किंमत डॉलर ८०० हून अधिक घटवून डॉलर २,६५७ प्रति किलो निश्चित करण्यात आली आहे. ही कपात निर्दिष्ट शुल्क श्रेणीअंतर्गत लागू होणार आहे.

जागतिक दरांचा थेट परिणाम भारतात

जागतिक बाजारात सोने-चांदीच्या किमती वाढल्या किंवा घटल्या, तर त्याचा थेट परिणाम भारतातील दरांवर होतो. याआधी आयात शुल्कामुळे किंमत कपात मर्यादित राहायची, मात्र नव्या निर्णयामुळे ही कपात अधिक प्रमाणात ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. परिणामी दागिने आणि मौल्यवान धातू स्वस्त होण्याची शक्यता आहे.

काही आयातींना सवलत लागू नाही

मात्र, या निर्णयात दागिने, मौल्यवान धातूंपासून बनवलेल्या वस्तू तसेच पोस्ट किंवा कुरिअरद्वारे होणाऱ्या आयातींचा समावेश नाही. चांदीची आयात किंमत २७ जानेवारी रोजी, तर सोन्याची किंमत शेवटची २२ जानेवारी रोजी सुधारित करण्यात आली होती. सरकार दर पंधरा दिवसांनी आयात किंमतीचा आढावा घेत असते.

आर्थिक आव्हानांचाही इशारा

या निर्णयामुळे एकीकडे व्यापार तूट वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तसेच डॉलरच्या तुलनेत रुपयावर अतिरिक्त दबाव येण्याची शक्यता आहे. आयात किंमतीत कपात झाल्याने येत्या आठवड्यात सोने-चांदीवरील आयात शुल्क वाढवण्याचा पर्याय सरकारसमोर असू शकतो, अशी चर्चा आहे. मात्र सध्याच्या घडीला सर्व अंदाजांच्या विरुद्ध सरकारने कपातीचा निर्णय घेतला आहे.

 

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!