Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Shirdi Crime News : नदीत कार फेकून मृत्यूचा बनाव, भाजप नेत्याच्या मुलाचा धक्कादायक कांड, पोलिसही चक्रावले

Shirdi Crime News : नदीत कार फेकून मृत्यूचा बनाव, भाजप नेत्याच्या मुलाचा धक्कादायक कांड, पोलिसही चक्रावले

शिर्डी : मध्य प्रदेशातील राजगढमधील भाजप नेते महेश सोनी यांचा मुलगा विशाल सोनी याने स्वतःच्या मृत्यूचा बनाव रचून आर्थिक संकटातून सुटका करण्याचा प्रयत्न केला. ५ सप्टेंबरला कालीसिंध नदीत कार पडल्याची घटना घडवून त्याने अपघाती मृत्यूचे नाटक रचले. मात्र, पोलिसांच्या तांत्रिक तपासाने हा कट उघडकीस आला असून, विशालला महाराष्ट्रातील शिर्डी आणि शनी शिंगणापूर परिसरात फिरताना संभाजीनगर जिल्ह्यातील फर्दापूर पोलिसांनी अटक केली. या प्रकरणात कुटुंबातील सदस्यांचाही सहभाग असल्याचा संशय आहे. आश्चर्याची बाब म्हणजे, विशालने पोलिसांना चुकीची माहिती दिली तरी अद्याप त्याच्यावर गुन्हा दाखल झालेला नाही.

नेमकं प्रकरण काय?

मिळालेल्या माहितीनुसार, ५ सप्टेंबर रोजी पहाटे साडेपाच वाजता राजगढ पोलिसांना कालीसिंध नदीत एक कार पडल्याची माहिती मिळाली. तात्काळ घटनास्थळी धाव घेतलेल्या पोलिसांनी मच्छिमारांच्या मदतीने कार बाहेर काढली, मात्र त्यात कोणीही नव्हते. कारची ओळख पटल्यानंतर समजले की, ही भाजप नेते महेश सोनी यांचा मुलगा विशाल सोनी याची कार आहे.

विशाल त्या वेळी बेपत्ता होता. पोलिसांनी तात्काळ शोधमोहीम सुरू केली आणि एसडीआरएफचे पथक बोलावले. २० किलोमीटर परिसरात दहा दिवस शोध घेतला, पण कोणताही मृतदेह किंवा पुरावा सापडला नाही. यामुळे पोलिसांच्या मनात संशय निर्माण झाला. विशालच्या वडिलांनीही शोधात पुरेसे सहकार्य केले नाही, अशी चर्चा झाली. पोलिसांनी तपासाची दिशा तांत्रिक बाजूंकडे वळवली.

कॉल डिटेल रेकॉर्डने झाला पर्दाफाश

तपासादरम्यान विशालच्या मोबाईल सीडीआरची छाननी केली असता, धक्कादायक माहिती समोर आली. विशालचे लोकेशन महाराष्ट्रात असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी संभाजीनगर जिल्ह्यातील फर्दापूर पोलिस स्टेशनशी संपर्क साधला. त्या पथकाने विशालला शिर्डी आणि शनी शिंगणापूर परिसरात फिरताना शनिवारी (१७ सप्टेंबर) अटक केली.

चौकशीत विशालने कबुली दिली की, त्याच्यावर १ कोटी ४० लाखांहून अधिक कर्ज आहे. त्याच्याकडे सहा ट्रक आणि दोन प्रवासी वाहने आहेत, पण आर्थिक अडचणीमुळे कर्ज फेडता येत नव्हते. कुटुंबातील काही सदस्यांनी “मृत्यू प्रमाणपत्र मिळाल्यास कर्ज माफ होईल” असा सल्ला दिला होता. त्यातूनच त्याने हा कट रचला.

ट्रकमधून भाडे घेऊन नदीत कार ढकलली

विशालने पोलिसांना सांगितले की, ५ सप्टेंबर रोजी पहाटे ५ वाजता तो इंदूर रोडवरील गोपाळपुरा परिसरातील एका ढाब्यावर उभ्या असलेल्या ट्रकमधून भाडे घेऊन आला. त्यानंतर आपल्या कारमध्ये बसून नदीकाठावर गेला, हेडलाइट बंद केले आणि चालत असलेली कार पूलावरून नदीत ढकलली. पूलावर पॅरापेट नसल्याने कार सहज नदीत गेली. यानंतर तो एका ड्रायव्हरच्या बाईकवरून ढाब्यावर परत आला आणि लगेच इंदूरला जाणाऱ्या बसमध्ये बसून निघून गेला. दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रांमध्ये स्वतःच्या “मृत्यू”ची बातमी वाचून तो महाराष्ट्रात पलायन करून शिर्डी आणि शनी शिंगणापूरमध्ये लपला. तिथे फिरत असताना पोलिसांचा तपास त्याच्या मागे लागला.

अपहरणाचा बनावट ड्रामा

तपास चुकवण्यासाठी विशालने आणखी एक नाटक रचले. त्याने स्वतःचे कपडे फाडले, धुळीत लोळला आणि अपहरण झाल्याचा बनाव करून फर्दापूर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. मात्र, पोलिसांनी आधीच सीडीआर आणि इतर पुरावे गोळा केले होते. काही क्षणांतच त्याचा कट उघड झाला आणि अटक करण्यात आली.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!