Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

धक्कादायक! अहिल्यानगरच्या जामखेडमध्ये आठवीच्या विद्यार्थ्याला बेल्टने बेदम मारहाण, काय आहे प्रकरण?

धक्कादायक! अहिल्यानगरच्या जामखेडमध्ये आठवीच्या विद्यार्थ्याला बेल्टने बेदम मारहाण, काय आहे प्रकरण?

अहिल्यानगर : अहिल्यानगरच्या जामखेड येथील निवासी वस्तीगृहातून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वस्तीगृहातील नववीच्या मुलांनी आठवीतील विद्यार्थ्याला बेल्टने बेदम मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील आरोळे वस्ती येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निवासी वस्तीगृहात इयत्ता आठवीच्या मुलांना नववीच्या मुलांनी मारहाण केली आहे.याप्रकरणी शाळा प्रशासनाने जामखेड पोलिसांना माहिती दिल्यानंतर तातडीनं या घटनेची नोंद घेण्यात आली आहे .मारहाण झालेले विद्यार्थी आणि मारहाण करणारे विद्यार्थी अल्पवयीन असल्याने बाल न्याय मंडळामार्फत पुढील कारवाई केली जाणार आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

दरम्यान आठवीतील विद्यार्थ्यांना मारहाण करणाऱ्या अल्पवयीन मुलांचा सामाजिक पार्श्वभूमीचा अहवाल हा बाल न्यायमंडळाकडे सादर केला जाणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी दिली आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना समुपदेशनाची गरज असल्याचंही बोललं जात आहे. मात्र नेमकी मारहाण कोणत्या कारणामुळे झाली याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!