Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Ashok Kharat : अशोक खरात प्रकरणात पहिला अधिकारी अडचणीत; उपजिल्हाधिकाऱ्यावर मोठी कारवाई, प्रशासनात खळबळ

Ashok Kharat : अशोक खरात प्रकरणात पहिला अधिकारी अडचणीत; उपजिल्हाधिकाऱ्यावर मोठी कारवाई, प्रशासनात खळबळ

Ashok Kharat : नाशिकमधील अशोक खरात प्रकरणाचा तपास जसजसा पुढे जात आहे, तसतसे नवे धागेदोरे समोर येत असून आता शासकीय अधिकारीही अडचणीत येऊ लागले आहेत. या प्रकरणात मुंबईत उपजिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या अभिजीत भांडे पाटील यांची बदली करण्यात आली आहे. त्यांची प्रतिनियुक्ती संपुष्टात आणत त्यांना मंत्रालयात हलवण्यात आले आहे.

शेकडो महिलांच्या शोषणाच्या आरोपांमुळे आधीच राजकीय वर्तुळात खळबळ उडालेल्या या प्रकरणात, संबंधित सर्वांची चौकशी होणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर आता प्रशासकीय अधिकाऱ्यांवरही कारवाईचा बडगा उगारला जात आहे.

माहितीनुसार, अभिजीत भांडे पाटील यांचे अशोक खरात यांच्याशी संबंध असल्याचे समोर आले आहेत. खरातच्या कुटुंबीयांच्या नावावर असलेल्या जमिनीमध्ये त्यांनी गुंतवणूक केल्याचा आरोप असून त्यामुळे त्यांची अडचण वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच खरातशी संबंधित विविध व्यवहारांमध्ये त्यांचा सहभाग असल्याचाही संशय व्यक्त होत आहे.

या कारवाईनंतर महसूल विभागातील इतर अधिकाऱ्यांमध्येही धाक निर्माण झाला असून तपासाचा फास आणखी घट्ट होण्याची शक्यता आहे. दरम्यान, याआधीच रुपाली चाकणकर यांना या प्रकरणाशी संबंधित ट्रस्टमुळे आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यांचीही चौकशी होण्याची शक्यता आहे.

तपासादरम्यान खरातच्या फसवणुकीचे नवे प्रकारही समोर येत आहेत. अंधश्रद्धेचा आधार घेत विविध बनावट वस्तू विकून लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे, ‘एल्विश हनी’ नावाने एक किलो मध तब्बल ९ लाख रुपयांना विकल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. हे मध विशेष गुणधर्माचे असल्याचे सांगत लोकांना फसवले जात होते.

या व्यवहारातून मिळालेला पैसा ट्रस्टच्या माध्यमातून वैध दाखवण्याचा प्रयत्न केल्याचेही तपासात समोर आले असून, या प्रकरणात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे.

 

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!