Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Manikrao Kokate News : रोहित पवारांनी माफी मागावी; ‘त्या’ प्रकरणात माणिकराव कोकाटेंचा कोर्टात युक्तवाद

Manikrao Kokate News : रोहित पवारांनी माफी मागावी; ‘त्या’ प्रकरणात माणिकराव कोकाटेंचा कोर्टात युक्तवाद

नाशिक : पावसाळी अधिवेशनात रमी खेळतानाचा व्हायरल व्हिडिओ शेअर करून राज्याचे माजी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर हल्लाबोल केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार रोहित पवार यांच्याविरुद्ध मानहानीचा खटला दाखल झाला आहे. या प्रकरणाची नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयात ६ ऑक्टोबर रोजी झालेल्या सुनावणीत कोकाटे यांनी स्वतः हजर राहून जबाब नोंदवला. त्यात त्यांनी रोहित पवार यांच्याकडून सार्वजनिक माफी मागितली असून, व्हिडिओ मॉर्फ असल्याचा दावा केला आहे. पुढील सुनावणी ९ ऑक्टोबरला होणार असून, या प्रकरणाने महायुती आणि महाविकास आघाडीतील राजकीय तणाव वाढला आहे.

नेमकं प्रकरण काय?

जुलै २०२५ मध्ये पावसाळी अधिवेशनात कोकाटे यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला. यामध्ये ते ऑनलाइन ‘जंगली रमी’ खेळत असल्याचे दिसत होते. हा व्हिडिओ रोहित पवार यांनी सोशल मीडियावर शेअर करत, “शेतीच्या असंख्य समस्या प्रलंबित असताना, रोज ८ शेतकरी आत्महत्या करत असताना कृषिमंत्र्यांना रमी खेळण्याची वेळ आली का?” असे उपहासपूर्ण टोमणा मारला. या व्हिडिओमुळे कोकाटे यांच्यावर राजीनाम्याची मागणी झाली आणि अखेर कृषी खात्यापासून त्यांना हद्दपार करून क्रीडा व अल्पसंख्याक खात्याची जबाबदारी देण्यात आली. कोकाटे यांनी मात्र व्हिडिओ अपूर्ण असल्याचा आणि तो मॉर्फ असल्याचा दावा केला.

नाशिक कोर्टात कोकाटे यांनी सांगितले की, “व्हिडिओ मॉर्फ केलेला आहे. मला रमी खेळता येत नाही. माझ्या मोबाईलवर रमीची जाहिरात आली होती, ती बंद करण्यासाठी १५-२० मिनिटे लागली. त्याचवेळीचा अपूर्ण क्लिप काढून रोहित पवार यांनी शेअर केला. यामुळे माझी, पक्षाची आणि वैयक्तिक प्रतिमेला धक्का बसला, कृषीमंत्रीपद गमावले.” त्यांनी रोहित पवार यांना नोटीस पाठवून स्पष्टीकरण मागितले होते, पण उत्तर न मिळाल्याने फौजदारी मानहानीचा दावा दाखल केला. “रोहित पवार यांनी सार्वजनिक माफी मागावी,” असा ठाम आग्रह कोकाटे यांनी केला.

व्हिडिओ मिळाला कसा?

कोकाटे यांनी कोर्टात पुढे युक्तिवाद केला की, “रोहित पवार हे विधान परिषद सदस्य नसल्याने त्यांना अधिवेशनात येण्याची परवानगी नव्हती. तरीही हा व्हिडिओ त्यांच्याकडे कसा पोहोचला? व्हिडिओ कोणी कसा काढला, याची चौकशी व्हावी.” त्यांचे वकील मनोज पिंगळे यांनी सांगितले की, “नोटीस बजावूनही पवार यांच्याकडून उत्तर आलेले नाही. व्हिडिओ खरा आहे की नाही, याची न्यायालयीन तपासणी आवश्यक आहे. सत्य चौकशीतच बाहेर येईल.” कोकाटे यांनी हे प्रकरण अब्रूनुकसानीचे असल्याचे सांगत, भरपाईची मागणीही केली आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!