Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Nandurbar Accident : धनतेरसला सातपुड्यात भीषण अपघात, भाविकांच्या पिकअपवर काळाचा घाला; ६ जणांचा मृत्यू, १५ गंभीर जखमी

Nandurbar Accident : धनतेरसला सातपुड्यात भीषण अपघात, भाविकांच्या पिकअपवर काळाचा घाला; ६ जणांचा मृत्यू, १५ गंभीर जखमी

Nandurbar Accident : नंदूरबार जिल्ह्यात धनतेरसच्या शुभ मुहूर्तावर दीपोत्सवाला सुरुवात झाली असली तरी सातपुड्याच्या कुशीत एक भयानक अपघात घडला आहे. अस्तंबा यात्रा दर्शनासाठी गेलेल्या भाविकांच्या पिकअप वाहनाचा चांदशैली घाटात भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत सहा जणांचा जागीच मृत्यू झाला असून, १५ हून अधिक भाविक गंभीर जखमी झाले आहेत. जखमींची प्रकृती गंभीर असल्याने मृत्यूसंख्येचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सातपुड्याच्या दुर्गम भागातील अस्तंबा येथे दर्शन घेऊन परतत असलेल्या भाविकांच्या पिकअपमध्ये २२ ते २३ जण होते. चालकाचे वाहनावर नियंत्रण सुटल्याने चांदशैली घाटात पिकअप खाली कोसळली, असा प्राथमिक अंदाज आहे. या अपघातात सहा भाविकांचा जागीच मृत्यू झाला, तर उर्वरित जखमींना तात्काळ तळोदा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. स्थानिक सूत्रांनुसार, जखमींमध्ये अनेकांची अवस्था नाजूक आहे, ज्यामुळे मृत्यूसंख्या वाढू शकते.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ आणि तळोदा पोलिस यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेतली. मदतकार्य तात्काळ सुरू केले असून, जखमींना रुग्णालयात हलवण्यासाठी अनेक रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आल्या. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असून, अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी चौकशी सुरू आहे.

धनतेरसला अस्तंबा यात्रेसाठी हजारो भाविक सातपुड्यात गर्दी करतात. दुर्गम भाग असल्याने अनेकदा पिकअपसारख्या वाहनांचा वापर केला जातो, ज्यामुळे अपघाताचा धोका वाढतो. या घटनेने परिसरातील शोककळा पसरली असून, भाविक कुटुंबीयांना सांत्वन देताना प्रशासन प्रयत्नशील आहे. नंदूरबार जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगा प्राकृतिक सौंदर्यासाठी ओळखल्या जातात, पण खराब रस्ते आणि घाटमार्गांमुळे अपघात वारंवार घडतात.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!