जळगाव: जळगावमध्ये रेल्वेने काही प्रवाशांना उडावल्याची घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुष्पक एक्स्प्रेसमध्ये प्रवास कऱणाऱ्या काही प्रवाशांनी आग लागल्याची भीतीने ट्रेनमधून खाली उड्या मारल्या. मात्र याच वेळी समोरुन येणाऱ्या कर्नाटक एक्स्प्रेसने या प्रवाशांना उडवलं. यामध्ये काही प्रवाशांची मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान रेल्वे अधिकारी आणि इतर कर्मचारी घटनास्थळी पोहोचले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात जळगाव- मुंबई रेल्वे मार्गावर माहिजी आणि परधाडे स्थानकादरम्यान ही भीषण दुर्घटना घडली आहे.


