School Holiday October 2025 : ऑक्टोबर महिन्यात चिमुकल्याची मोठी चंगळ झाली आहे. महिन्याची सुरुवातच सुट्टीने झाली आहे. 1 ऑक्टोबर रोजी महानवमीमुळे अनेक शाळांना सुट्टी आहे. दुसऱ्यादिवशी 2 ऑक्टोबरला गुरुवारी दसरा आहे. त्यामुळे ऑक्टोबर महिन्याची सुरुवात ही खास झाली आहे. त्यानंतर आता ऑक्टोबर महिन्यात 17 दिवस बँक बंद राहणार आहे. सलग 9 दिवस सुट्टी असणार असा योग आला आहे.
नवरात्र आणि दसऱ्याचा उत्साह आहे. शाळा आणि महाविद्यालये सध्या बंद आहेत. अनेकजण लाँग विकेंड बघून आपल्या कुटुंबांसोबत वेळ घालवत आहे. ऑक्टोबर महिन्यातील शाळा-कॉलेजच्या सुट्ट्यांची यादी पहा.
सुट्यांचे दिवस पाहा
दिल्ली: दिल्लीतील शाळा 29 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर पर्यंत बंद ठेवण्यात आल्या आहेत. 3 ऑक्टोबर रोजी शाळा पुन्हा सुरू होतील. खाजगी शाळा त्यांच्या वेळापत्रकात थोडे बदल करू शकतात.
महाराष्ट्र : 2 ऑक्टोबर दसरा, गांधी जयंती. 3 शुक्रवारी एक सुट्टी घेऊन 4 आणि 5 ला अनुक्रमे शनिवार, रविवार असणार आहे. तसेच दिवाळीची सुट्टी ही 18 ऑक्टोबरपासून धनत्रयोदशी सुरु होणार आहे. दिवाळीची सुट्टी 2 नोव्हेंबरपर्यंत असणार आहे.
उत्तर प्रदेश: दसरा आणि गांधी जयंतीनिमित्त उत्तर प्रदेशातील शाळा 1 आणि 2ऑक्टोबर रोजी बंद राहण्याची घोषणा करण्यात आली आहे.
बिहार: बिहारमधील बहुतेक जिल्ह्यांमध्ये, 27 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर पर्यंत शाळा बंद राहतील. काही जिल्ह्यांमध्ये, सुट्टी 5 ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आली आहे.
तेलंगणा: तेलंगणामधील शाळा 21 सप्टेंबर पासून बंद आहेत. 3 ऑक्टोबर रोजी वर्ग पुन्हा सुरू होतील.
झारखंड: झारखंडमधील सरकारी शाळा 27 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर पर्यंत बंद राहतील. अनेक शाळा 5 ऑक्टोबर पर्यंत बंद राहतील.
ओडिशा: ओडिशामधील शाळा 29 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर पर्यंत बंद राहतील. 3 ऑक्टोबर रोजी वर्ग पुन्हा सुरू होतील.
पश्चिम बंगाल: दुर्गा पूजा हा पश्चिम बंगालमधील एक प्रमुख सण आहे. त्यामुळे 24 सप्टेंबर पासून शाळा बंद आहेत. ही सुट्टी 6 ऑक्टोबर पर्यंत सुरू राहील.


