Today गुरूवार, 5th नोव्हेंबर 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Oxford University Press: शिवरायांशी संबंधित ‘त्या’ आक्षेपार्ह मजकुराबद्दल ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसची 21 वर्षांनंतर जाहीर माफी

Oxford University Press: शिवरायांशी संबंधित ‘त्या’ आक्षेपार्ह मजकुराबद्दल ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसची 21 वर्षांनंतर जाहीर माफी

Oxford University Press: छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अत्यंत आक्षेपार्ह आणि अप्रमाणित मजकूर प्रसिद्ध केल्याप्रकरणी अखेर तब्बल २१ वर्षांनंतर ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस (OUP) इंडियाने बिनशर्त माफी मागितली आहे. २००३ मध्ये जेम्स लेन यांच्या वादग्रस्त पुस्तकातील चुकीच्या दाव्यांमुळे महाराष्ट्रासह देशभरात संतापाची लाट उसळली होती. याप्रकरणी प्रेसने आता मुंबई उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करून आपली चूक मान्य केली आहे.

नेमकी चूक काय होती?

२००३ मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘शिवाजी: हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया’ या जेम्स लेन यांच्या पुस्तकात शिवरायांच्या व्यक्तिमत्त्वाविषयी आणि त्यांच्या कुटुंबाविषयी काही आक्षेपार्ह विधाने करण्यात आली होती. विशेषतः पुस्तकातील पृष्ठ क्रमांक ३१, ३३, ३४ आणि ९३ वरील मजकूर अत्यंत विवादास्पद होता. हा मजकूर पुराव्यांच्या कसोटीवर टिकू शकला नाही, हे आता प्रेसने अधिकृतपणे मान्य केले आहे. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसने प्रसिद्ध केलेल्या जाहीर नोटिशीत म्हटले आहे की, पुस्तकात केलेले दावे पडताळणीअंती खोटे आणि अप्रमाणित आढळले आहेत. असा मजकूर प्रकाशित झाल्याबद्दल प्रेसला मनापासून पश्चात्ताप होत आहे. ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वांबद्दल माहिती देताना जी अचूकता आणि संवेदनशीलता हवी होती, ती पाळली गेली नाही.

उदयनराजे भोसले आणि शिवप्रेमींची माफी

प्रेसने आपल्या प्रतिज्ञापत्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे १३ वे वंशज खासदार उदयनराजे भोसले यांच्यासह संपूर्ण शिवप्रेमी जनतेची जाहीर माफी मागितली आहे. ज्यांच्या भावना या पुस्तकामुळे दुखावल्या गेल्या, त्या सर्वांप्रती प्रेसने दिलगिरी व्यक्त केली आहे. या पुस्तकातील मजकुरामुळे २००४ मध्ये महाराष्ट्रात मोठा वाद निर्माण झाला होता. संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी पुण्याच्या भांडारकर ओरिएंटल रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये (BORI) तोडफोड केली होती. संस्थेने लेखकाला चुकीचे संशोधन पुरवल्याचा आरोप त्यावेळी करण्यात आला होता. या घटनेनंतर हे पुस्तक आणि त्यातील मजकूर अनेक कायदेशीर कचाट्यात अडकला होता. भविष्यात ऐतिहासिक तथ्ये मांडताना अधिक सावधगिरी बाळगू आणि कोणत्याही महापुरुषाचा अवमान होणार नाही याची काळजी घेऊ, असे आश्वासनही ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसने दिले आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!