Pune News: खंडणी विरोधी पथक-2, गुन्हे शाखा पुणे शहर कडून पुणे शहरात अमली पदार्थाचा साठा पुरवणाऱ्या सराईत आरोपीला अटक करण्यात आली आहे. साजिद खान असे आरोपीचे नाव आहे. खान याला अटक करून त्याचाकडून लाखोंचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
25 लाख रुपयाचे 127 ग्रॅम मेफेड्रोन जप्त
गुन्हे शाखा पुणे शहर आणि खंडणी विरोधी पथक-2 यांनी तब्बल 25 लाख रुपयाचे 127 ग्रॅम मेफेड्रोन ( MD) जप्त केले. काळ्या रंगाच्या चारचाकीतून एमडी जप्त केला गेला आहे. ती कारही पोलीसांनी ताब्यात घेतली आहे. दरम्यान हे अमली पदार्थ कुठून आणले गेले?, त्याला कुठे पाठवणार होते? याचा तपास पोलीस करत आहेत.
नुकताच काही दिवसांपूर्वी पुण्यात बनावट गुटख्याचा कारखाना उद्ध्वस्त करण्यात आला. पुणे पोलिसांनी तब्बल 1 कोटी रुपयांचा मुद्देमाल या कारवाईत जप्त केला. पुण्यातील लोणी काळभोर परिसरात ही मोठी कारवाई केली आहे.गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथक-2 च्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बनावट गुटखा तयार करण्याच्या कारखान्यावर छापा टाकला होता. पुण्यातील थेऊर फाटा येथील कांबळेवस्ती भागातील एका गोदामावर छापा टाकत ही कारवाई करण्यात आली.
गोडावूनवर छापा कारवाई
पोलिसांनी गोडावूनवर छापा टाकत कारवाई केली आहे. बनावट आर.एम.डी. गुटख्याची सुंगधीत तुंबाखु व विमल गुटखा पान मसाला तसेच गोडाऊनच्या बाजुस शेतामध्ये बनावट गुटखा तंबाखु तयार करण्याठी लागणारे कच्चामाल जप्त केला आहे. ज्यात बनावट सुपारी, सुंगधीत तंबाखु, थंडक, केमिकल, गुलाबपाणी, प्रिन्टेड पाऊच, बॉक्स व पोती असा एकूण एक कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.


