Today मंगळवार, 26th मे 2026
Breaking News
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Baramati: बारामती हादरलं! कॉलेजसाठी घराबाहेर पडलेल्या 21 वर्षीय तरुणीचा 6 दिवसांनी विहिरीत आढळला मृतदेह, माळेगावमधील घटना

Baramati: बारामती हादरलं! कॉलेजसाठी घराबाहेर पडलेल्या 21 वर्षीय तरुणीचा 6 दिवसांनी विहिरीत आढळला मृतदेह, माळेगावमधील घटना

Pune Crime: पुणे जिल्ह्याच्या बारामती तालुक्यातून एक हादरवुन टाकणारी बातमी समोर आली आहे. गेल्या सहा दिवसांपासून बेपत्ता असलेल्या २१ वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळल्याने माळेगाव बुद्रुक परिसरात खळबळ उडाली आहे. प्रतिक्षा मेमाणे असे या मृत मुलीचे नाव आहे. या घटनेने कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला असून तरुणीसोबत नेमकं काय घडलं? याचा तपास सध्या सुरु आहे.

२१ वर्षीय तरुणीचा विहिरीत मृतदेह
याबाबत सविस्तर माहिती अशी की, बारामती तालुक्यातील शारदानगर माळेगाव बुद्रुक परिसरातील बेपत्ता असलेली 21 वर्षीय तरुणी थेट मृताअवस्थेत आढळून आली आहे.माळेगाव खुर्द-केव्हीके रस्त्यालगत असणाऱ्या एका विहिरीमध्ये या 21 वर्षीय तरुणीचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आल्याची माहिती समोर येत आहे.

प्रतीक्षा दत्तात्रय मेमाणे असं मृत तरुणीचे नाव असून ती गेल्या सहा दिवसापासून बेपत्ता होती या संदर्भात तिच्या वडिलांनी माळेगाव पोलीस ठाण्यामध्ये मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. प्रतीक्षा ही नऊ मार्च रोजी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास कॉलेजला जाते असे सांगून घरातून बाहेर पडली होती. मात्र त्यानंतर ती कॉलेजला ही गेली नाही आणि घरी देखील परत आली नाही.

हेही वाचा- Pune Dog Attack: कुत्र्यांनी 15 मिनिट लचके तोडले; चाकणमध्ये महिलेचा भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात तडफडून जागीच मृत्यू

मुलगी घरी परत आली नसल्याने प्रतीक्षा चे वडील दत्तात्रय मेमाणे यांनी माळेगाव पोलीस ठाण्यामध्ये या संदर्भात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर शनिवारी एका विहिरीच्या पाण्यावर या तरुणीचा मृतदेह आढळून आला. ही आत्महत्या की हत्या या संपूर्ण प्रकरणाचा तपास आता माळेगाव पोलीस करत आहेत.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!