Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Pune Crime: महिनाभर आधी झालेलं प्रेयसीचं लग्न, पहिल्या प्रियकराने नवऱ्याला भेटायला बोलवलं अन् संपवलं

Pune Crime: महिनाभर आधी झालेलं प्रेयसीचं लग्न, पहिल्या प्रियकराने नवऱ्याला भेटायला बोलवलं अन् संपवलं

Pune Crime: पुरंदर तालुक्यातील माळशिरस येथे एका महिलेच्या पहिल्या प्रियकराने तिच्या नवऱ्याचा कोयत्याने डोक्यात वार करून खून केल्याची घटना घडली. आरोपीच्या प्रेयसीशी लग्न केल्याचा राग मनात धरून हा हल्ला करण्यात आला. या घटनेमुळे परिसरात खळबळ निर्माण झाली आहे. या घटनेत दीपक गोरख जगताप (रा. राजेवाडी, ता. पुरंदर) याचा खून झाला आहे. तर आरोपी सुशांत संदीप मापारी (रा. माळशिरस ता. पुरंदर / मूळ रा. राहू ता. दौड जि. पुणे) हा खून करून फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

फोन, व्हॉट्सअपवर धमक्या

या खुनाबाबत जेजुरी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, पुरंदर तालुक्यातील राजेवाडी येथील मयत दीपक जगताप याचा नुकताच वाघापूर ता. पुरंदर येथील पायल अमोल कांबळे हिच्याशी एक महिन्यापूर्वी प्रेमविवाह झाला होता. मयत दीपक जगताप हा उरुळी कांचन येथे खासगी गॅरेजमध्ये नोकरी करत होता. नोकरीच्या निमित्ताने लग्नानंतर सहा दिवसांनी तो पत्नीसह उरुळी कांचन येथे राहण्यास गेला. महिनाभर संसार सुरळीत चालू असताना, पायलचा पहिला प्रियकर सुशांत मापारी हा त्या दोघांच्या मोबाईलवर फोन आणि व्हॉट्सअप कॉल करून, मी पायलशी लग्न करणार होतो, तुम्ही दोघांनी लग्न का केले? असा राग मनात धरून जीवे मारण्याच्या धमक्या देत होता. याबाबत मयत दीपक ने आपल्या घरातही माहिती दिली होती.

वाद मिटवण्यासाठी भेटला आणि ‘खेळ खल्लास’ करून टाकला…

शनिवारी, 13 डिसेंबरला, दीपक पायलसह राजेवाडी येथे आला. पायलला घरी सोडून घरी परतत असताना त्याला सुशांत मापारी सतत कॉल करत होता. ‘पायलचा मोबाईल माझ्याकडे आहे, तो घेऊन जा आणि लग्नाचा वाद मिटवून टाक’, असे सांगत राहिला. याच बहाण्याने सुशांत दीपकला भेटला. माळशिरस हद्दीतील रामकाठी शिवारात त्याने दीपकला बोलावून घेतले. याच ठिकाणी आरोपीने दीपकच्या डोक्यात, मानेवर, पायावर धारदार कोयत्याने वार करून त्याचा खून केला. त्यानंतर तो कोयता जागेवरच टाकून पसार झाला.

नातेवाईकांनी शोध घेतल्यावर प्रकरण उघडकीस

दीपक जगताप घरी न आल्याने आणि त्याचा मोबाईल बंद असल्याने नातेवाईकांनी शोध घेतला असता माळशिरस गावच्या रामकाठी शिवारात रक्तबंबाळ अवस्थेत दीपकचा मृतदेह आढळून आला. या ठिकाणी दीपक आणि आरोपी सुशांत या दोघांच्या दुचाकी आढळून आल्या. याबाबतची फिर्याद मयत दीपकचे मामा संतोष शेंडकर (रा. चांबळी ता. पुरंदर) यांनी जेजुरी पोलीस ठाण्यात दिली. घटनास्थळी सासवड उपविभागिय पोलीस अधिकारी राजेंद्रसिंह गौड आणि बारामती विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांनी भेट देऊन माहिती घेतली. पोलिसांना तपासाच्या योग्य त्या सूचना दिल्या आहेत.

पोलिसांकडून खुनाचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास जेजुरी पोलीस ठाण्याचे सपोनि दीपक वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासासाठी पोलिसांनी पथके तयार करून पोलीस उपनिरीक्षक महेश पाटील पुढील तपास करीत आहेत.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!