पिंपरी: वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी निलेश चव्हाणला नेपाळमधून अटक करण्यात आली आहे. मागील काही दिवसांपासून निलेश चव्हाण हा फरार होता. अखेर पिंपरी-चिंचवड पोलिसांना त्याला शोधून काढण्यात यश आले आहे.
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात वैष्णवीच्या चुलत्यांसह इतरांना धमकवणारा तसेच इतर आरोप असणारा निलेश चव्हाण फरार होता. पुणे आणि पिंपरी-चिंचवड पोलीस गेल्या काही दिवसांपासून त्याचा शोध घेत होते. अखेर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी त्याला नेपाळमधून अटक केली आहे.
पिंपरी- चिंचवड पोलिसांच्या सहा पथकांकडून निलेश चव्हाणचा शोध घेण्यात येत होता. चव्हाणहा दुसऱ्या राज्यात असल्याचा संशय व्यक्त केला जात होता. मात्र, तो नेपाळ येथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी त्याला अटक केली आहे. आता लवकरच त्याला पिंपरी- चिंचवडमध्ये आणले जाणार आहे.


