Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

जय पवारांच्या लग्नात अजित दादांचा डान्स; रोहित अन् युगेंद्र पवार…, सुप्रिया सुळेंनी शेअर केले खास क्षण

जय पवारांच्या लग्नात अजित दादांचा डान्स; रोहित अन् युगेंद्र पवार…, सुप्रिया सुळेंनी शेअर केले खास क्षण

पुणे: राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार आणि खासदार सुनेत्रा पवार यांच्या धाकट्या मुलाचा लग्नसोहळा पार पडत आहे. जय पवार यांचं लग्न बहरीनमध्ये पार पडत असून काही महिन्यांपूर्वीच जय आणि ऋतुजा पाटील यांचा साखरपुडा धुमधडाक्यात पार पडला होता, आता यांचा विवाह सोहळा 4 ते 7 डिसेंबर रोजी बहरीनमध्ये होत आहे.

बहरीनमधील या शाही लग्नसोहळ्यासाठी पवार–पाटील कुटुंबीयांकडून केवळ 400 पाहुण्यांना निमंत्रण देण्यात आलं आहे. या लग्नाची सर्वत्र चर्चा सुरू असतानाच अजित पवारांचे सख्खे लहान भाऊ श्रीनिवास पवार बहरीनला लग्नाला गेले नाहीत.जय पवार यांच्या लग्नासाठी आमदार रोहित पवार आणि नुकतेच विवाह झालेले युगेंद्र पवार यांची उपस्थिती लक्षणीय ठरली. खासदार सुप्रिया सुळेंनी या लग्नसोहळ्याच्या वरातीचे फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत.

सुप्रिया सुळेंकडून लग्नसोहळ्याच्या वरातीचे फोटो-व्हिडिओ शेअर

 

View this post on Instagram

 

A post shared by Supriya Sule (@supriyasule)

खासदार शरद पवार, प्रतिभा पवार आणि सुप्रिया सुळे लग्नसोहळ्यासाठी गेल्या नाहीत. मात्र, सुप्रिया सुळेंनी जय की बारात.. असे म्हणत या लग्नाच्या वरातीचे खास फोटो शेअर केले आहेत. समोर आलेल्या व्हिडिओमध्ये अजित पवार पांढऱ्या रंगाच्या शेरवानी ड्रेसमध्ये डोळ्यावर गॉगल अन् फेटा बांधून नाचताना दिसून येतात. अजित दादांचा डान्स सध्या व्हायरल होत आहे. लेकाच्या लग्नाच सैराट चित्रटातील झिंगाट गाण्यावर नाचताना बापमाणूस आणि राज्याचे उपमुख्यमंत्री पाहून अनेकांना तो व्हिडिओ चांगलाच आवडलाय.

रोहित पवारांचा खास लूक… पांढऱ्या रंगाची शेरवानी, डोळ्यावर गॉगल

जय यांच्या वरातीत अजित पवारांसह आमदार रोहित पवार आणि युगेंद्र पवार हेही दिसून येत आहेत. रोहित पवार यांनीही पांढऱ्या रंगाचा शेरवानी आणि डोळ्यावर गॉगल घातल्याचं दिसून येतं. दरम्यान, या लग्नसोहळ्यातील हळदीचेही फोटो समोर आले असून पवार आणि पाटील कुटुंबीयांसह नातलगांच्या चेहऱ्यावरील लग्नाचा आनंदोत्सव लपत नाही.

युगेंद्र पवार आणि तनिष्का कुलकर्णी यांचा विवाहसोहळा

नुकताच बीकेसी येथील जिओ सेंटरमध्ये 30 नोव्हेंबर रोजी युगेंद्र पवार आणि तनिष्का कुलकर्णी यांचा विवाहसोहळा थाटात संपन्न झाला. या सोहळ्याला पवार कुटुंब युगेंद्र आणि तनिष्का यांना शुभआशिर्वाद देण्यासाठी एकत्र आल्याचे पाहायला मिळाले. उद्धव ठाकरे यांनी देखील सहकुटुंब या लग्नसोहळ्याला हजेरी लावली होती. तसेच राजकीय क्षेत्रासह इतर क्षेत्रातील मान्यवरही लग्नसोहळ्यासाठी उपस्थित होते.

लग्नसोहळ्याच वेळापत्रक

या लग्नसोहळ्यात जवळच्या केवळ 400 पाहुण्यांना निमंत्रण पाठवण्यात आले आहे. जय पवार आणि ऋतुजा पाटील यांच्या लग्नानिमित्त 4 डिसेंबर रोजी मेहंदी पार पडली. 5 डिसेंबर रोजी हळद, वरात आणि मुख्य लग्नसोहळा पार पडणार आहे. 6 डिसेंबर रोजी संगीत, तर 7 डिसेंबर रोजी स्वागत समारंभ होणार आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!