Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

PMC Election: पुण्यात अजित पवार आणि शरद पवार एकत्र येणार? शशिकांत शिंदेंची कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांसोबत बैठक

PMC Election: पुण्यात अजित पवार आणि शरद पवार एकत्र येणार? शशिकांत शिंदेंची कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांसोबत बैठक

Pune Election: महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आघाडी करणार का हे लवकरच स्पष्ट होणार आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे हे आज शुक्रवारी (दि. १९) शहरातील सर्व नेत्यांच्या, इच्छुक उमेदवारांसोबत संवाद साधत आहेत. यावेळी त्यांच्याकडून ही भूमिका स्पष्ट केली जाणार असल्याचे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून सांगण्यात आले.

महापालिका निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर शहरात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. पुण्यात या निवडणूका महाविकास आघाडीत लढण्याचे सांगत राष्ट्रवादीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आघाडीतील घटक पक्षांच्या सोबत चर्चा सुरू करण्याचे पत्र प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी काढले होते. त्यानंतर लगेचच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याची चर्चेला जोर आला.

तर, दोन दिवसांपूर्वी पुण्यात बैठकांसाठी आलेल्या अजित पवारांची भेट घेण्यासाठी पिंपरी-चिंचवडचे शहराध्यक्ष भेटीसाठी गेले होते. त्यामुळे या चर्चेला आणखी जोर आला. त्यानंतर शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी प्रदेशाध्यक्ष पुण्यात इच्छुक उमेदवार आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन भूमिका स्पष्ट करणार असल्याचे माध्यमांशी बोलताना सांगितले होते.

त्यानुसार ही बैठक सकाळी पक्ष कार्यालयात होणार आहे. त्यात, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष महाविकास आघाडी सोबत जाणार की राष्ट्रवादी सोबत हे स्पष्ट होणार आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!