Today सोमवार, 27th जुलै 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Ankita Patil Thackeray : अंकिता पाटील ठाकरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

Ankita Patil Thackeray : अंकिता पाटील ठाकरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

इंदापूर : पुणे जिल्हा परिषदेच्या आगामी पंचवार्षिक निवडणुकीसाठी राजकीय वातावरण तापू लागले आहे. पुणे जिल्हा परिषदेच्या दि. 5 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी बावडा-लुमेवाडी जि. प. गटातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवार म्हणून अंकिता हर्षवर्धन पाटील (ठाकरे) यांचा उमेदवार अर्ज इंदापूर तहसील कार्यालयामध्ये निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे बुधवारी(दि. 21) दाखल करण्यात आला.

हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत मिरवणूक

‌अंकिता पाटील ठाकरे यांचा अर्ज दाखल करणेसाठी हजारो कार्यकर्ते मिरवणुकीने इंदापूर शहरातील दूधगंगा दूध संघ ते तहसिल कार्यालय असे वाजत-गाजत आले होते, त्यामुळे परिसरात दुमदुमून गेला होता. अंकिता पाटील ठाकरे यांचा उमेदवारी अर्ज सुचक उदयसिंह विलासराव पाटील यांनी दाखल केला. यावेळी प्रदीपमामा जगदाळे, राजवर्धन पाटील, मनोज पाटील, निरा भिमा कारखान्याचे उपाध्यक्ष दादासाहेब घोगरे, बावडा गावच्या सरपंच पल्लवी गिरमे उपस्थित होत्या.

हेही वाचा – साखर दरातील घसरणीमुळे साखर उद्योग अडचणीत; शिष्टमंडळ जाणार अमित शाहांच्या भेटीला – हर्षवर्धन पाटील

पंचायत समिती गणांचेही अर्ज दाखल

दरम्यान, बावडा-लुमेवाडी जिल्हा परिषद गटा अंतर्गत बावडा पंचायत समिती गणातून धनश्री किरण पाटील (चाकाटी) व लुमेवाडी पंचायत समिती गटातून शिवाजी विजयसिंह मोहिते (टणु ) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. अंकिता पाटील ठाकरे यांनी पुणे जिल्हा परिषदेच्या मावळत्या सभागृहात सुमारे तीन वर्षे जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून प्रभावीपणे काम केले आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!