Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Pune Crime News : आयुष कोमकरला 9 गोळ्या घालून हत्या, मारेकरी म्हणाले, ‘इथे फक्त आंदेकरच!’

Pune Crime News : आयुष कोमकरला 9 गोळ्या घालून हत्या, मारेकरी म्हणाले, ‘इथे फक्त आंदेकरच!’

पुणे : पुण्यातील नाना पेठ परिसरात टोळीयुद्धाने पुन्हा एकदा रक्तरंजित वळण घेतले आहे. 5 सप्टेंबर रोजी रात्री 8 वाजता 18 वर्षीय आयुष कोमकर याची दोन मारेकऱ्यांनी गोळ्या झाडून निर्घृण हत्या केली. ही हत्या मागील वर्षी झालेल्या वनराज आंदेकर हत्येचा बदला म्हणून आंदेकर टोळीने केल्याचा संशय आहे. या प्रकरणात पुणे पोलिसांनी 13 जणांवर गुन्हा दाखल केला असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे मारेकऱ्यांची ओळख पटली आहे.

5 सप्टेंबरला गणेश विसर्जनाच्या आदल्या रात्री आयुष कोमकर क्लासवरून घरी परतला होता. तो नाना पेठेतील आपल्या इमारतीच्या पार्किंगमध्ये गाडी लावत असताना यश पाटील आणि अमित पाटोळे या दोन मारेकऱ्यांनी त्याच्यावर अंदाधुंद गोळीबार केला. आयुषच्या शरीरात तब्बल 9 गोळ्या घुसल्या, आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. गोळीबार करताना मारेकरी ‘इथे फक्त बंडू आंदेकर आणि कृष्णा आंदेकरच!’ असे ओरडत होते. यामुळे परिसरात दहशत पसरली.

सीसीटीव्ही फुटेजमुळे मारेकऱ्यांची ओळख

पुणे पोलिसांनी आयुषची आई कल्याणी कोमकर यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला. तपासादरम्यान इमारतीतील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, मारेकरी यश पाटील आणि अमित पाटोळे असल्याचे स्पष्ट झाले. या फुटेजच्या आधारे पोलिसांनी संपूर्ण आंदेकर कुटुंबावर गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये आंदेकर टोळीचे प्रमुख सूर्यकांत ऊर्फ बंडू आंदेकर, त्यांचा मुलगा कृष्णा ऊर्फ कृष्णराज, शिवम ऊर्फ शुभम, तुषार वाडेकर, स्वराज वाडेकर, अभिषेक आंदेकर, वृंदावनी वाडेकर, शिवराज आंदेकर, लक्ष्मी आंदेकर, अमन पठाण ऊर्फ खान, यश पाटील, अमित पाटोळे आणि सूजल मेरगु यांचा समावेश आहे.

वनराज आंदेकर हत्येचा बदला?

पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, ही हत्या गेल्या वर्षी 1 सप्टेंबर 2024 रोजी झालेल्या वनराज आंदेकर हत्येचा बदला असल्याचे दिसते. वनराज हा बंडू आंदेकर यांचा मुलगा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचा माजी नगरसेवक होता. त्याच्या हत्येनंतर आंदेकर आणि कोमकर टोळ्यांमधील संघर्ष तीव्र झाला होता. आयुष कोमकरच्या हत्येमुळे पुण्यातील टोळीयुद्धाने पुन्हा एकदा हिंसक वळण घेतले आहे.

अंत्यसंस्कार आणि पोलिसांचा तपास

आयुष कोमकरच्या हत्येनंतर गणेश विसर्जनाच्या काळात पुण्यात तणावाचे वातावरण होते. त्यामुळे पोलिसांनी त्याचा मृतदेह ससून रुग्णालयाच्या शवागारात ठेवला होता. सोमवारी, 8 सप्टेंबर 2025 रोजी आयुषवर अंत्यसंस्कार होणार आहेत. यासाठी आयुषचे वडील गणेश कोमकर यांना नागपूर मध्यवर्ती कारागृहातून पॅरोलवर सोडण्यात येणार आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!