Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Baramati Bypoll 2026 : बारामतीत सुनेत्रा पवारांची दमदार मुसंडी; पहिल्याच फेरीत ६,५०० मतांची आघाडी

Baramati Bypoll 2026 : बारामतीत सुनेत्रा पवारांची दमदार मुसंडी; पहिल्याच फेरीत ६,५०० मतांची आघाडी

Baramati Bypoll 2026 : महाराष्ट्रातील बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणुकांच्या मतमोजणीला आज सकाळपासून सुरुवात झाली असून बारामतीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सुरुवातीपासूनच जोरदार आघाडी घेतली आहे. पहिल्याच फेरीअखेर त्या सुमारे ६,५०० मतांनी आघाडीवर असल्याची माहिती समोर आली असून त्यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर बारामती विधानसभा मतदारसंघात ही पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीत सुनेत्रा पवार यांच्यासह एकूण २३ उमेदवार रिंगणात आहेत. सकाळी ८ वाजल्यापासून बारामती एमआयडीसी परिसरातील वखार महामंडळाच्या गोदामात मतमोजणीला सुरुवात झाली.

सुरुवातीला पोस्टल मतांची मोजणी करण्यात आली. त्यातही सुनेत्रा पवार आघाडीवर असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर सकाळी ८.३० वाजता ईव्हीएम मतमोजणीला सुरुवात झाली आणि पहिल्याच फेरीत त्यांनी मोठी आघाडी घेतली.

बारामतीतील ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, अशी भूमिका महायुतीसोबतच शरद पवार गटानेही घेतली होती. काँग्रेसने सुरुवातीला उमेदवार दिला होता, मात्र चर्चेनंतर अर्ज मागे घेण्यात आला. तरी काही अपक्ष उमेदवार मैदानात कायम आहेत.

सर्व प्रमुख पक्ष, स्थानिक संघटना आणि अनेक बड्या नेत्यांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा दर्शवल्याने ही निवडणूक जवळपास एकतर्फी ठरणार असल्याचे चित्र आधीपासूनच स्पष्ट होते. पहिल्या फेरीतील ६,५०० मतांची आघाडी पाहता त्यांचा विक्रमी मताधिक्याने विजय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

बारामतीत अजित पवार यांच्या निधनानंतर भावनिक वातावरण निर्माण झाले असून, या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवारांना मतदारांचा मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे. आता त्यांचा अंतिम विजयाचा आकडा किती असेल, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!