Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

पिंपरी-चिंचवड मतदार यादीत मोठा घोळ.. ! माजी नगरसेवकासह १२६१ मतदारांची नावे गायब, प्रभाग बदलून ‘वॉर्ड फेरबदल’

पिंपरी-चिंचवड मतदार यादीत मोठा घोळ.. ! माजी नगरसेवकासह १२६१ मतदारांची नावे गायब, प्रभाग बदलून ‘वॉर्ड फेरबदल’

पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या प्रारूप मतदार यादीत प्रचंड गोंधळ उघडकीस आला आहे. प्रभाग क्रमांक १२ मधून अजित पवार गटाच्या माजी नगरसेवक पंकज भालेकर यांच्यासह तब्बल १२६१ मतदारांची संपूर्ण यादीच गायब झाली असून ती प्रभाग क्रमांक १ मध्ये ट्रान्सफर करण्यात आल्याचे समोर आले आहे. भालेकर यांनी स्वतःचे नावच यादीत नसल्याचे सांगत हा “हेतुपुरस्सर डाव” असल्याचा गंभीर आरोप केला आहे.

“२०२४ च्या विधानसभा मतदार यादीत माझे नाव प्रभाग १२ मध्येच होते. आता अचानक १२६१ मतदारांची यादी प्रभाग १ मध्ये टाकली. मी याच प्रभागातून उमेदवारी अर्ज भरण्याच्या तयारीत असताना माझेच नाव गायब करणे, हा भाजपचा डाव आहे. निवडणूक विभागाला हाताशी धरून माझे १२०० पेक्षा जास्त मतांचे लीड कमी करण्याचा हा कट आहे,” असे भालेकर यांनी थेट आरोप केले.

प्रभाग १२ मधील भाजपचे माजी नगरसेवक शांताराम भालेकर यांनीही आपल्या प्रभागातील शेकडो मतदारांची नावे काढून टाकल्याची तक्रार केली आहे. प्रभाग ६ मध्ये मोशी-कुदळवाडीतील मतदारांची नावे घुसडली गेली, तर प्रभाग १६ ची नावे प्रभाग १७ मध्ये टाकली गेली. चिखलीतील प्रभाग १ मधील पूर्णानगर, कृष्णानगर, घरकुल येथील हजारो मतदारांची नावे प्रभाग ११ मध्ये हलवल्याने प्रभाग १ ची मतदारसंख्या थेट ७४,३४० वर पोहोचली आहे.

राष्ट्रवादीचे शहर सरचिटणीस विनायक रणसुभे यांच्या पत्नी व सामाजिक कार्यकर्त्या योगिता रणसुभे यांच्यासह संपूर्ण कुटुंबाचे नाव प्रभाग १ ऐवजी ११ मध्ये टाकले गेले. “प्रत्यक्ष स्थळ तपासणी न करता डेस्कवरून याद्या बदलल्या गेल्या. हा निवडणुकीतील मोठा घोटाळा आहे,” अशी संतप्त प्रतिक्रिया रणसुभे यांनी दिली.

प्रारूप यादी प्रसिद्ध झाल्यानंतर अवघ्या पहिल्याच दिवशी (२१ नोव्हेंबर) निवडणूक विभागाकडे १७ हरकती दाखल झाल्या असून यात सर्वाधिक १३ हरकती ‘ह’ क्षेत्रीय कार्यालयात आल्या आहेत. नागरिक आणि राजकीय पक्षांच्या वतीने आक्षेपांचा पूर येत असून, मतदार यादी दुरुस्तीची मुदत १९ डिसेंबरपर्यंत आहे. मात्र, या घोळामुळे पिंपरी-चिंचवडमध्ये राजकीय तापमान प्रचंड वाढले आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!