Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Pune Crime : पुण्यात कॉलेजबाहेर रक्तरंजित थरार! विद्यार्थ्यावर कोयत्याने सपासप वार; परिसरात खळबळ

Pune Crime : पुण्यात कॉलेजबाहेर रक्तरंजित थरार! विद्यार्थ्यावर कोयत्याने सपासप वार; परिसरात खळबळ

Pune Crime : पुणे शहरात कॉलेजसमोर विद्यार्थ्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याने खळबळ उडाली आहे. वाघोली परिसरात एका विद्यार्थ्यावर टोळक्याने कोयत्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात विद्यार्थी गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेचा थरकाप उडवणारा सीसीटीव्ही व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रायसोनी कॉलेज समोर हा प्रकार घडला. नागेश जगताप हा विद्यार्थी आपल्या मित्रांसोबत हॉटेलबाहेर चहा पिण्यासाठी बसला होता. त्याचवेळी काही युवक तिथे आले आणि त्यांनी अचानक नागेशवर कोयत्याने सपासप वार करण्यास सुरुवात केली.

हल्ला इतका भीषण होता की आरोपीने मारलेला कोयता थेट नागेशच्या डोक्यात अडकून राहिला. त्यानंतर जखमी अवस्थेतच त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. हा संपूर्ण थरार हॉटेलबाहेरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, जुना वाद मनात धरून मंगेश सांगळे हा आपल्या दोन साथीदारांसह घटनास्थळी आला होता. सुरुवातीला नागेश आणि मंगेश यांच्यात शाब्दिक वाद झाला. “तू मला शिवी का दिली?” असा जाब विचारत मंगेशने अचानक नागेशवर कोयत्याने हल्ला केला.

या हल्ल्यात नागेशच्या डोक्यावर, पाठीवर आणि शरीराच्या इतर भागांवर गंभीर जखमा झाल्या. घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. या प्रकरणी वाघोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. उर्वरित दोघांचा शोध सुरू आहे. या घटनेमुळे पुणे शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!