Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Pune Crime News : संशयातून वृद्धेची हत्या; 6 वर्षीय चिमुरडीचाही गळा दाबला, आळंदीतील दुहेरी हत्याकांडाचा मास्टरमाइंड समोर

Pune Crime News : संशयातून वृद्धेची हत्या; 6 वर्षीय चिमुरडीचाही गळा दाबला, आळंदीतील दुहेरी हत्याकांडाचा मास्टरमाइंड समोर

Pune Crime News : पुणे जिल्ह्यातील आळंदी परिसर हादरवणाऱ्या दुहेरी हत्याकांडाचा पोलिसांनी अवघ्या काही तासांत उलगडा केला आहे. सहा वर्षीय धनश्री केदारी आणि ७० वर्षीय मंगल शिंदे यांच्या हत्येप्रकरणी विनायक तुकाराम भवारी (३१) याला अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीला मंगल शिंदे या आपल्या पत्नीला आपल्याविरुद्ध भडकवत असल्याचा संशय होता. या रागातून त्याने प्रथम शिंदे यांचे डोके भिंतीवर आपटून त्यांची हत्या केली. त्यानंतर ओळख पटेल या भीतीने झोपेत असलेल्या चिमुकल्या धनश्रीचा उशीने तोंड दाबून खून केला.

धनश्रीची आई कामानिमित्त बाहेर असताना आरोपीने घरात प्रवेश करून हा थरारक प्रकार घडवला. सकाळी हा प्रकार उघडकीस येताच परिसरात एकच खळबळ उडाली.

तांत्रिक तपासाच्या आधारे पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेने आरोपीचा माग काढत आळेफाटा येथून त्याला अटक केली. तपासात उघड झाले की, आरोपी आणि धनश्रीची आई यांची दोन वर्षांपूर्वी सोशल मीडियावर ओळख होऊन त्यांचे लग्न झाले होते. मात्र अलीकडे दोघांमध्ये वाद वाढल्याने तो वेगळा राहत होता.

या कौटुंबिक वादातूनच हे भीषण हत्याकांड घडल्याचे समोर आले असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

 

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!