Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

जीएसटीच्या बनावट पावत्या बनवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

जीएसटीच्या बनावट पावत्या बनवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

पुणे: केंद्रीय वस्तू आणि सेवा कराच्या (जीएसटी) पुणे-२ आयुक्तालयाच्या वसुली अधिकाऱ्यांनी इन्पुट टॅक्स क्रेडिट (आयटीसी) मिळवणे आणि ते चालवून घेण्यासाठी बनावट पावत्या तयार करणाऱ्या आणखी एका टोळीचा पर्दाफाश केला आहे. या बनावट पावत्यांची अंदाजे रक्कम २५कोटी रुपये इतकी आहे. इनपुट टॅक्स क्रेडिटचा लाभ घेण्याच्या आणि वापरण्याच्या उद्देशाने वस्तूंची कोणतीही ने-आण केल्याशिवाय या बनावट पावत्या जारी केल्या गेल्या. अशा आठ बनावट कंपन्या/खोट्या कंपन्यांचा प्रारंभिक शोध लागला असून, त्यापैकी सहा पुण्यातल्या आहेत. फसवणूक केलेल्या करांच्या रकमेचे स्वरूप आणि फसवणूक करणाऱ्या कंपन्यांच्या प्रादेशिक व्याप्तीचे मूल्यांकन केले जात आहे.

पुण्यातील रहिवासी असलेल्या या संघटित टोळीचा सूत्रधार असलेल्या आरोपींना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे. ज्या कंपन्यांनी बनावट इनपुट टॅक्स क्रेडिटचा लाभ घेतला आहे त्यांच्याकडून पुढील तपास आणि वसुलीची कारवाई सुरू असल्याचे जीएसटी अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. सीजीएसटी पुणे-२ आयुक्तालयाद्वारे पुणे आणि जवळपासच्या भागात सक्रीय असलेल्या एकाधिक बनावट असलल्या जीएसटी इनव्हॉइसिंग आणि बनावट आयटीसी पेडलिंग संघटित टोळीशी संबंधित नऊ जणांना गेल्या सोळा महिन्यांत अटक करण्यात आली आहे. बनावट आयटीसीच्या धोक्याचे समूळ उच्चाटन करण्यासाठी हा विभाग कटिबद्ध असून, ते त्याच्या कायदेशीर थकबाकी देणाऱ्या कंपन्यांची यामुळे फसवणूक होते आणि खऱ्या करदात्यांवर यामुळे अन्याय होतो आणि अर्थविभागाचे नुकसान होते.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!