Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या हस्ते पुण्यातील अपघातग्रस्त कुटुंबाला मदतीचा धनादेश सुपूर्द

विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या हस्ते पुण्यातील अपघातग्रस्त कुटुंबाला मदतीचा धनादेश सुपूर्द

पुणे: पुणे येथील टाटा मोटर्स या कंपनीतील कंत्राटदार नियुक्त कंत्राटी कामगार पुष्पेंद्र कुमार यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी कामगार आयुक्त, टाटा कंपनीचे अधिकारी यांना पीडित कुटुंबाला तत्काळ आर्थिक मदत देण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या हस्ते पीडित कुटुंबाला 35 लाख रूपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. विधानसभा उपाध्यक्ष यांच्या दालनात झालेल्या पत्रकार परिषदेत टाटा मोटर्सचे व्यवस्थापक, कामगार विभागाचे अधिकारी, पोलीस अधिकारी व कामगार नेते आदी उपस्थित होते.

उपाध्यक्ष अण्णा बनसोडे म्हणाले की, अपघातानंतर कामगारांच्या कुटुंबांची जबाबदारी कंपनीने घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे. सर्व संबंधित अधिकारी, पोलिस विभाग आणि कॉन्ट्रॅक्टर यांच्या सहकार्याने पीडित कुटुंबाला 35 लाख रुपयांची मदत देण्याचा निर्णय झाला, हे समाधानकारक असल्याचे बनसोडे यांनी सांगितले.
या निर्णयामुळे पीडित कुटुंबाला दिलासा मिळाला असून, पुढील काळातही व्याजाच्या स्वरूपात त्यांना आधार मिळणार आहे, असेही उपाध्यक्ष बनसोडे यांनी सांगितले.

मृत्यू झालेल्या पुष्पेद्रकुमार यांना कंत्राटाचे काम दिलेले होते. या घटनेची गंभीरता लक्षात घेऊन मे.टाटा मोटर्स यांनी पीडित कुटुंबाला 30 लाख रुपये मुदत ठेव स्वरुपात आणि त्यावरील व्याजातून दर महिन्याला कुटुंबाला आर्थिक मदत देण्याचे मान्य केले. तसेच, खर्चासाठी 5 लाख रुपये पीडित कुटुंबाला देण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!