Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Gautami Patil : पुण्यात गौतमी पाटीलच्या कारचा भीषण अपघात; ड्रायव्हरने रिक्षाला उडवलं

Gautami Patil : पुण्यात गौतमी पाटीलच्या कारचा भीषण अपघात; ड्रायव्हरने रिक्षाला उडवलं

Gautami Patil Car Accident : महाराष्ट्रातील प्रसिद्ध लावणी नृत्यांगना गौतमी पाटील (Gautami Patil) पुन्हा एकदा वेगळ्या कारणाने चर्चेत आली आहे. तिच्या कारचा पुणे-मुंबई-बंगळूरू महामार्गावरील वडगाव पुलाजवळ (Vadgaon Bridge) भीषण अपघात झाला आहे. या अघटनेत तिच्या ड्रायव्हरने उभ्या असलेल्या रिक्षाला जोरदार धडक दिली.

या अपघातात रिक्षाचालकासह दोन प्रवासी जखमी झाले असून, त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुपरहिट अल्बम्स आणि स्टेज परफॉर्मन्समुळे ओळखली जाणारी गौतमी अपघाताच्या वेळी कारमध्ये नव्हती, त्यामुळे ती सुरक्षित आहे. सिंहगड रोड पोलिस तपास करत असून, अपघाताचे फोटो सोशल मीडियावर वायरल झाले आहेत. या घटनेत रिक्षाची मोठी हानी दिसून येते.

नेमकं काय घडलं?

मंगळवारी (३० सप्टेंबर) पहाटे सुमारे ५ वाजता पुण्याच्या मुंबई-बंगळूरू महामार्गावरील वडगाव बुद्रुक परिसरात एका हॉटेलसमोर ही घटना घडली. माहितीनुसार, रिक्षाचालक आणि दोन प्रवासी असलेली रिक्षा हॉटेलजवळ उभी होती. मागून भरधाव वेगाने आलेल्या गौतमीच्या कारने रिक्षाला पाठीमागून जोरदार धडक दिली. धडकेमुळे रिक्षा उडाली आणि त्यात मोठे नुकसान झाले. जखमींची स्थिती गंभीर असल्याने त्यांना जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

या अपघाताची माहिती मिळताच सिंहगड रोड पोलिस घटनास्थळी धावले. कार आणि ड्रायव्हर तिथेच सापडले, त्यामुळे ड्रायव्हरला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली. ड्रायव्हरने कार गौतमी पाटीलची असल्याचे कबूल केले. प्राथमिक तपासात वेगावरून नियंत्रण सुटल्याची शक्यता सांगितली जात आहे.

 

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!