Gopichand Padalkar : पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर झालेल्या शाईफेक प्रकरणानंतर आता राजकीय वातावरण तापले आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी संग्राम भंडारे यांच्या समर्थनार्थ आमदार गोपीचंद पडळकर उघडपणे मैदानात उतरले आहेत. त्यांनी पुण्याचे पोलिस आयुक्तांना विनंती करत संग्राम भंडारे यांच्यावर चुकीच्या पद्धतीने कारवाई करू नये, अशी भूमिका मांडली. (Gopichand Padalkar)
पडळकर म्हणाले की, महाराष्ट्रातील संत परंपरेचा अपमान करणारी वक्तव्ये समाज कधीही सहन करणार नाही. विकास लवांडे यांनी वारकरी संप्रदायातील महाराजांविषयी केलेले वक्तव्य अत्यंत निषेधार्ह असल्याचा आरोप त्यांनी केला. (Gopichand Padalkar)
संग्राम भंडारे यांनी दिलेली प्रतिक्रिया उत्स्फूर्त असल्याचे सांगत पडळकरांनी तिचे समर्थन केले. “संत परंपरा हिंदू धर्मरक्षणासाठी नेहमीच अग्रस्थानी राहिली आहे. अशा परंपरेवर टीका झाल्यास समाजाची भावना तीव्र होणे स्वाभाविक आहे,” असे ते म्हणाले. (Gopichand Padalkar)
यावेळी त्यांनी पोलिस प्रशासनाला आवाहन करत, माध्यमांमध्ये होत असलेल्या काही दाव्यांवर विश्वास ठेवून कठोर कारवाई करू नये, आधी सखोल चौकशी करावी, असे स्पष्ट केले. “संग्राम भंडारेंच्या पाठीशी संपूर्ण हिंदू समाज ताकदीने उभा आहे,” असेही पडळकर यांनी ठामपणे सांगितले. (Gopichand Padalkar)


