Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

अखेर हवेली मोजणी कार्यालयाचे उपअधीक्षक अमरसिंह पाटील निलंबित

अखेर हवेली मोजणी कार्यालयाचे उपअधीक्षक अमरसिंह पाटील निलंबित

पुणे: हेलीकॉप्टर शॉटसाठी माहिर असलेले हवेलीचे उपअधिक्षक अमरसिंह रामचंद्र पाटील यांना शासनाने निलंबित केले आहे. महाराष्ट्र शासनाच्या उपसचिव आश्विनी यमगर यांनी आज (दि. २५) हवेलीचे उपअधिक्षक अमरसिंह पाटील यांच्या निलंबनाचा आदेश जारी केला आहे.

उपअधीक्षक अमरसिंह पाटील व भूकरमापक किरण येटाळे यांच्यावर हडपसर येथील जमीन मोजणी प्रकरणात येरवडा पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून ते फरार झाले आहेत. हवेली मोजणी कार्यालयाबाबत उपसंचालक भूमि अभिलेख कार्यालय, जमाबंदी आयुक्त कार्यालय तसेच महसूलमंत्री यांच्याकडे नागरिकांनी तक्रारी केलेल्या होत्या. यामुळे हवेली मोजणी कार्यालयाची प्रतिमा मलीन झालेली आहे. त्यामुळे शासनाने अमरसिंह पाटील यांना पुढील आदेश होईपर्यंत शासकीय सेवेतून निलंबित केले आहे.

निलंबन काळात पाटील यांचे मुख्यालय कार्यालय हे उपअधिक्षक कार्यालय -लोहारा, जिल्हा धाराशिव असून त्यांनी धाराशिव जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख यांच्या पुर्व परवानगीशिवाय मुख्यालय सोडता कामा नये, असे निलंबन आदेशात स्पष्ट नमूद करण्यात आले आहे.

अमर पाटील यांना हडपसर येथील मोजणी प्रकरण भोवलं..

हडपसर येथील सर्वे नं. 181/3, 181/4अ, 181/6 व 181/9/1 या मिळकतीची सन 2023 व सन 2024 मध्ये भुमीअभिलेख कार्यालय, हवेली, पुणे यांच्याकडून शासकीय फी अदा करुन कायदेशीर रितसर पद्धतीने मोजणी तक्रारदाराने करुन घेतली होती. मात्र, सदर जागेच्या मोजणीनंतर हद्द निश्चिती करण्यासाठी व तसा मोजणी नकाशा देण्यासाठी ‘हेलिकॉप्टर शॉट लाच’ मागणी व चुकीच्या मोजणीचे ‘क’ प्रत प्रकरण उपअधीक्षक पाटील यांच्यावर चांगलेच शेकले आहे. तसेच याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याने त्यांना शासनाने निलंबित केले आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!