Today सोमवार, 27th जुलै 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

पुण्यात भीषण अपघात! भरधाव कारची धडक; 4 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू, अनेक जखमी

पुण्यात भीषण अपघात! भरधाव कारची धडक; 4 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू, अनेक जखमी

Pune Accident : पुण्यातील खडकवासला गावात भीषण अपघाताची घटना घडली असून एका भरधाव कारने रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांना जोरदार धडक दिल्याने मोठा हाहाकार उडाला आहे. या दुर्घटनेत 4 वर्षीय चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू झाला असून 3 ते 4 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सायंकाळी सुमारे 5.30 वाजता MH 25 BH 6489 क्रमांकाची ‘टाटा पंच’ कार खडकवासला धरण परिसराकडे जात होती. यावेळी चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कारने समोर असलेल्या 6 दुचाकी आणि एका रिक्षाला जोरदार धडक दिली. धडकेनंतर कार थेट रस्त्याच्या विरुद्ध बाजूला असलेल्या दुकानात घुसली, ज्यामुळे मोठे नुकसान झाले.

या अपघातात यशराज निलेश कांबळे (वय 4) हा गंभीर जखमी झाला होता. त्याला तातडीने सिंहगड रोडवरील जगताप रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान सायंकाळी 6.40 वाजता त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात शोक आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

अपघातानंतर पोलिसांनी कार चालक अमोल गोरक्षनाथ गेगडे याला अटक केली असून त्याचा मित्र प्रकाश तात्याराम कोठारे यालाही ताब्यात घेण्यात आले आहे. दोघांना वैद्यकीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून पुढील तपास सुरू केला आहे. या प्रकरणाचा तपास नांदेड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल भोई यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!