Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Rain Alert : अवकाळी पावसाचा राज्यावर कहर; वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस, ‘या’ २४ जिल्ह्यांना यलो अलर्ट

Rain Alert : अवकाळी पावसाचा राज्यावर कहर; वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस, ‘या’ २४ जिल्ह्यांना यलो अलर्ट

Rain Alert : राज्यात सध्या एकीकडे कडक उन्हाचा तडाखा जाणवत असतानाच दुसरीकडे अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. हवामानात अचानक बदल झाल्यामुळे मुंबई, ठाणे, पालघर, कोकण, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. पुढील काही तास आणि दिवस नागरिकांसाठी महत्त्वाचे ठरणार असून राज्यातील २४ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार, विदर्भातील अकोला आणि वर्धा येथे काल ४५ अंश सेल्सिअस इतक्या उच्चांकी तापमानाची नोंद झाली. आजही उष्णतेची लाट कायम राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. मात्र, दुसरीकडे राज्यातील अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याने वातावरणात मोठा बदल होत आहे.

दरम्यान, बदलापूर परिसरात आज सकाळी अचानक पावसाने हजेरी लावली. गेल्या काही दिवसांपासून ४० अंशांपेक्षा जास्त तापमानाचा सामना करणाऱ्या नागरिकांना या पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला, मात्र कामावर जाणाऱ्या नोकरदारांची तारांबळ उडाली. अनेकांना भिजतच रेल्वे स्थानक गाठावे लागले.

यवतमाळ, अमरावती आणि नांदेड जिल्ह्यांमध्ये रात्रीच्या सुमारास जोरदार पाऊस झाला. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली असून, वादळी वाऱ्यामुळे काही ठिकाणी झाडे कोसळली आणि वीजपुरवठा खंडित झाला. विशेषतः तीळ पिकांवर या पावसाचा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

हवामान विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्याचा सल्ला दिला आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!