पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये छेडछाडीची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मंगळवारी (दि. 25) रात्री मराठी भाषा विभागाजवळ एका पुरूषाने तीन विद्यार्थिनींच्या समोर हस्तमैथुन केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेची माहिती विद्यापीठ अधिकाऱ्यांना देऊनही कोणतीही कारवाई करण्यात आली नाही, असा विद्यार्थिनींनी केला आहे. याप्रकरणी कारवाईची मागणी करत विद्यार्थी डॉ. बाबासाहेब आंबेडकर इमारतीबाहेर निदर्शने करत आहेत. या संतापजनक घटनेमुळे विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. दरम्यान, विद्यार्थी विद्यापीठ कॅम्पसमध्ये चांगल्या सुरक्षा उपाययोजनांची मागणी करत आहेत. तसेच विद्यापीठ प्रशासन त्यांच्या तक्रारी गांभीर्याने घेत नसल्याचा आरोप देखील विद्यार्थ्यांनी यावेळी केला आहे.
दरम्यान, विद्यार्थिनींनी कुलगुरूंची भेट घेऊन घडलेला सदर प्रकार सांगितला असता, रात्री उशीरा 9 वाजेपर्यंत मुली तिकडे काय करत होत्या, असा प्रतिप्रश्न त्यांनी विद्यार्थिनींना केला.
या प्रकरणी विद्यापीठ प्रशासनाने कोणतीही कारवाई केली नाही म्हणून त्यांच्यावर टीका होत आहे. विद्यापीठ कॅम्पसमध्ये मुलींच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाने पुरेसे उपाय केले नसल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. अनेक विद्यार्थ्यांनी निषेध आंदोलनात सामील झाले असून ते विद्यापीठ प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत.


