पुणे : सिंहगड रस्त्यावरील नऱ्हे परिसरात किरकोळ वादातून मामाने १५ वर्षांच्या भाच्याच्या चाकू भोसकून निर्घृण खून केल्याचा प्रकार शुक्रवारी (दि. २८) उघडकीस आला. या प्रकारानंतर पसार झालेल्या मामाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. गजानन गजकोश (वय १५, रा. धारावी, मुंबई) हे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी मेघनाथ अशोक तपासे (वय ४१, रा. मानाजीनगर, नव्हे) याला अटक करण्यात आली.
गजानन हा मामा मेघनाथ याच्याकडे वास्तव्यासाठी आला होता. त्याची शुक्रवारी रात्री त्याचे मामाच्या मुलाशी भांडण झाले. त्या वादातून मेघनाथने गजाननला . पट्ट्याने बेदम मारहाण केली. तसेच, स्वयंपाकघरातील चाकूने त्याच्या छातीवर वार केला. चाकूने भोसकल्याने मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाल्याने गजाननचा मृत्यू झाला.


