Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Pimpri-Chinchwad: एका दिवसात तब्बल 724 फ्लेक्स, किऑक्स जप्त; महापालिकेकडून एक लाख रुपयांचा दंड वसूल

Pimpri-Chinchwad: एका दिवसात तब्बल 724 फ्लेक्स, किऑक्स जप्त; महापालिकेकडून एक लाख रुपयांचा दंड वसूल

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक जानेवारी 2026 होणार आहे. त्या निमित्ताने माजी नगरसेवक तसेच, इच्छुकांनी शहरभरात विनापरवाना फ्लेक्स, किऑक्सपोस्टर्स लावून शहर विद्रुप केले आहे. महापालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाच्या पथकांनी शहभरात धडक कारवाई करीत एका दिवसात 724 फ्लेक्सकिऑक्स जप्त केले आहेत. तसेच, एकूण 1 लाख रुपयांचा दंड वसुल केले आहेत.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात मोठ्या प्रमाणात विनापरवाना फ्लेक्स, किऑक्स, पोस्टर्स तसेच, होर्डिग लागले आहेत. फ्लेक्स लावण्यासाठी इच्छुकांची चढाओढ दिसत आहे. चौक, बाजारपेठ, मंडई, उद्यान अशा वर्दळीच्या ठिकाणी मोठ्या संख्येने फ्लेक्स लावण्यात येत आहेत. जागा मिळेल तेथे फ्लेक्स लावले जात आहेत. विद्युत प्रकाशाचे खांब, झाड, सिग्नलचे खांब, बॅरिकेट्स, सीमा भिंत, कठडे आदी ठिकाणी धोकादायकरित्या फ्लेक्स लावले गेले आहेत. त्यामुळे अपघात होण्याचा धोका वाढला आहे.

अशा फ्लेक्स, किऑक्सहोर्डिगवर तातडीने कारवाई करण्याचे आदेश आयुक्त तथा प्रशासक श्रावण हर्डीकर यांनी दिले आहेत. त्यानुसार आकाशचिन्ह व परवाना विभागाने मंगळवारी (दि.9) दिवसभरात धडक कारवाई मोहिम राबविली. अकाशचिन्ह व परवाना विभागाच्या कर्मचार्‍यांसह सर्व आठ क्षेत्रीय कार्यालयातील पथकांनी धडक कारवाई करीत एकूण 724 फ्लेक्सकिऑक्स जप्त केले. तसेच, नागरिरक, संस्था, दुकानदार, व्यावसायिक यांच्याकडून एकूण 1 लाख रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. ही कारवाई नियमितपणे सुरू राहणार आहे, असे अधिकार्‍यांनी स्पष्ट केले आहे.

दंड तसेच, फौजदारी गुन्हे दाखल करणार

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुक तसेच, काही संस्था व एजन्सीकडून विनापरवाना फ्लेक्सकिऑक्स लावण्यात येतात. त्यामुळे शहर विद्रुप होत आहे. तसेच, अपघाताचा धोका वाढला आहे. विनापरवाना फ्लेक्सकिऑक्स तसेच, पोस्टर काढून जप्त करण्यात येत आहे. तसेच, दंडात्मक कारवाई केली जात आहे. प्रसंगी फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत, असे महापालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाचे उपायुक्त राजेश आगळे यांनी सागितले.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!