Today सोमवार, 15th जून 2026
Breaking News
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Pune Crime: हडपसरमध्ये अनाधिकृत कॉल सेंटरवर पोलिसांची धडक कारवाई; अमेरिकन नागरिकांची फसवणूक, १५.७६ लाखांचा मुद्देमाल जप्त

Pune Crime: हडपसरमध्ये अनाधिकृत कॉल सेंटरवर पोलिसांची धडक कारवाई; अमेरिकन नागरिकांची फसवणूक, १५.७६ लाखांचा मुद्देमाल जप्त

Pune Crime: हडपसर परिसरातील मार्वेल फिगो बिल्डिंगमधील एका अनधिकृत कॉल सेंटरवर पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी १५.७६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. कॉल सेंटरमधून आरोपी अमेरिकन नागरिकांची फसवणूक करत असल्याची माहिती उघड झाली आहे. कारवाईत पोलिसांनी कॉल सेंटरमधून २९ लॅपटॉप, २० कंप्यूटर, ४१ मोबाईल, ७ राऊटर आणि इतर इलेक्ट्रॉनिक साहित्य जप्त केले आहे.

कॉल सेंटरमध्ये कार्यरत असलेली टोळी अमेरिकन नागरिकांच्या संगणक आणि मोबाईलमध्ये पॉपअप्सच्या माध्यमातून मालवेअर पाठवून त्यांना फसवत होती. बनावट अँटीव्हायरस व प्रोटेक्शन अ‍ॅप्सच्या नावाखाली त्यांच्याकडून बायनान्स व ट्रस्ट वॉलेटसारख्या क्रिप्टो प्लॅटफॉर्मवर पैसे घेतले जात होते.

या प्रकरणी कॉल सेंटरचे चालक निर्मल अजय शहा, अतुल श्रीमाळी आणि युगंधर हादगे यांना अटक करण्यात आली. त्यांच्यासह २९ जणांचा पोसिलांनी ताब्यात घेतले आहे. कारवाई दरम्यान दोन आरोपी फरार झाले. पोलिसाकडून त्यांचा शोध सुरु आहे. हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेशकुमार, सहआयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर आयुक्त पंकज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या युनिट ५ च्या पथकाने केली. या कारवाईत पोनि. संजय पतंगे व त्यांच्या सहकाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!