Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

पुण्यात चार लाखांची लाच स्वीकारताना मंडल अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडले

पुण्यात चार लाखांची लाच स्वीकारताना मंडल अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडले

पिंपरी: बंगल्याची सातबारा उताऱ्यात नोंद करण्यासाठी तक्रारदाराकडून चार लाखांची लाच स्वीकारताना मंडल अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले. सुरेंद्र साहेबराव जाधव (वय ५६ वर्ष, पद-मंडलाधिकारी, चिंचवड कार्यालय, पिंपरी, पुणे) असे रंगेहाथ पकडलेल्या मंडल अधिकाऱ्याचे नाव असून, याप्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

तक्रारदार यांनी वाल्हेकरवाडी येथे ६ गुंठे जागा घेवून त्यावर एक बंगला बांधला आहे. नमुद बंगल्याची सातबारा उताऱ्यात नोंद करण्यासाठी लोकसेवक सुरेंद्र जाधव यांनी तक्रारदाराकडे ५ लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. त्यावर तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे कार्यालयात तक्रार दिली. या तक्रारीवरुन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पडताळणी करून सापळा रचला.

प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने लोकसेवक सुरेंद्र जाधव यांच्याकडे पंचासमक्ष पडताळणी केली असता, जाधव यांनी तक्रारदाराकडे वरील नमुद काम करण्यासाठी तडजोडीअंती ४,५०,००० रुपयाची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार चार मार्च रोजी केलेल्या सापळा कारवाई दरम्यान लोकसेवक सुरेंद्र जाधव यांनी मागितलेल्या लाच रक्कमेपैकी तक्रारदाराकडून चार लाख रुपयांची लाच स्विकारुन, ती गाडीत ठेवली असता, त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. सदर लाच रक्कम पंचासमक्ष गाडीतून जप्त करण्यात आलेली आहे. लोकसेवक सुरेंद्र जाधव यांच्याविरुद्ध पिंपरी पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, सन १९८८ अन्वये गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणेचे पोलीस उप आयुक्त/पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!