Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

पुण्यात भीषण अपघात! ठाकरे सेनेच्या नेत्याच्या कारची रिक्षाला जोरदार धडक; रिक्षाचालकाचा मृत्यू

पुण्यात भीषण अपघात! ठाकरे सेनेच्या नेत्याच्या कारची रिक्षाला जोरदार धडक; रिक्षाचालकाचा मृत्यू

Accident News : पुण्यातील मुळशी तालुक्यात चांदे-मूलखेड रस्त्यावर रिक्षा आणि फॉर्च्युनर कारमध्ये भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात रिक्षाचालकाचा जागीच मृत्यू झाला असून फॉर्च्युनरमधील तिघे जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्याचाही समावेश असल्याची माहिती आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत रिक्षाचालकाचे नाव विकास अर्जुन पारखी असून ते स्थानिक रहिवासी होते. चांदे-मूलखेड रस्त्यावर भरधाव वेगाने येणाऱ्या फॉर्च्युनर कारची रिक्षाला जोरदार धडक बसली. धडकेची तीव्रता इतकी होती की रिक्षाचालक गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला.

या अपघातात फॉर्च्युनरमधील तिघे जणही जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. जखमींमध्ये ठाकरे सेनेचे पुणे जिल्हाप्रमुख प्रकाश भेगडे यांचाही समावेश असून त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. इतर जखमींची प्रकृती स्थिर असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना रुग्णालयात हलवले. दरम्यान, अभिमन्यू अर्जुन पारखी यांच्या फिर्यादीवरून फॉर्च्युनर चालकाविरुद्ध पौड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून तपास सुरू केला असून वेग आणि निष्काळजीपणा यामुळे हा अपघात घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. पुढील तपास सुरू आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!