Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Pune Election 2025: पुण्यात अजित पवारांची हवा! राष्ट्रवादीची मोठी झेप, 17 महत्त्वाच्या नगरपरिषदांपैकी 9 जागांवर विजय

Pune Election 2025: पुण्यात अजित पवारांची हवा! राष्ट्रवादीची मोठी झेप, 17 महत्त्वाच्या नगरपरिषदांपैकी 9 जागांवर विजय

Pune Election 2025: पुणे जिल्ह्यातील नगरपरिषद आणि नगरपालिका निवडणुकीच्या निकालात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने (अजित पवार गट) मोठं यश संपादन केलं आहे. जिल्ह्यातील एकूण 17 महत्त्वाच्या नगरपरिषदांपैकी 9 जागांवर राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष निवडून आले आहेत. या विजयाची बातमी समजताच पुण्यातील बारामती हॉस्टेल बाहेर कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी आणि ढोल-ताशांच्या गजरात जल्लोष केला. विशेष म्हणजे, अजित पवार सध्या याच ठिकाणी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी आणि मुलाखती घेत आहेत.

विजयानंतर नवनिर्वाचित नगराध्यक्ष आणि इच्छुक उमेदवार अजित पवारांची भेट घेण्यासाठी बारामती हॉस्टेलवर गर्दी करत आहेत. आगामी काळातील विकासकामे आणि नगरपरिषदेतील सत्तेची समीकरणे जुळवण्यासाठी पवारांनी स्वतः या ठिकाणी लक्ष घातले आहे.

बारामती – सचिन सातव – राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)

लोणावळा- राजेंद्र सोनवणे – राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)

तळेगाव दाभाडे – संतोष दाभाडे – भारतीय जनता पक्ष (BJP)

दौंड- दुर्गादेवी जगदाळे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)

चाकण- मनीषा गोरे – शिवसेना

शिरूर – ऐश्वर्या पाचरणे – राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)

इंदापूर – भरत शाह – राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)

सासवड- आनंदी काकी जगताप भारतीय जनता पक्ष (भाजप)

जेजुरी – जयदीप बारभाई- राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)

भोर – रामचंद्र आवारे- राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)

आळंदी – प्रशांत कुराडे – भारतीय जनता पक्ष (BJP)

जुन्नर – सुजाता काजळे – शिवसेना (एकनाथ शिंदे गट)

राजगुरुनगर – मंगेळ गुंडा – शिवसेना (एकनाथ शिंदे गट)

वडगाव मावळ – आंबोली ढोरे – राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)

मंचर- राजश्री गांजले – शिवसेना (एकनाथ शिंदे गट)

माळेगाव- सुयोग सातपुते – राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)

उरुळी फुरसुंगी – संतोष सरोदे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)

पुणे जिल्ह्यातील ग्रामीण आणि शहरी भागात राष्ट्रवादी काँग्रेसने आपली पकड मजबूत असल्याचे पुन्हा एकदा दाखवून दिले आहे. बारामती, इंदापूर आणि लोणावळा यांसारख्या महत्त्वाच्या ठिकाणी राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष निवडून येणे ही अजित पवारांसाठी मोठा विजय मानला जात आहे. दुसरीकडे, शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपनेही काही जागांवर आपले वर्चस्व राखलं आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!