Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Pune News : पुण्यात लिफ्टमध्ये अडकून ७ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू; परिसरात शोककळा

Pune News : पुण्यात लिफ्टमध्ये अडकून ७ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू; परिसरात शोककळा

Pune News : पुण्यातील सिंहगड रोड परिसरातून अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. खेळत असताना लिफ्टमध्ये अडकलेल्या ७ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे. शिवांश शैलेश धूत असे मृत मुलाचे नाव असून ही घटना निम्बजनगर येथील रिद्धी-सिद्धी अपार्टमेंटमध्ये सोमवारी रात्री घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवांश इमारतीत खेळत असताना एकटाच लिफ्टमध्ये गेला होता. त्याने लिफ्टची बटणे दाबल्यानंतर लिफ्ट सुरू झाली, मात्र दुसऱ्या मजल्यापूर्वीच ती अचानक बंद पडली. त्यामुळे शिवांश लिफ्टमध्येच अडकून पडला.

बराच वेळ शिवांश घरी न परतल्याने कुटुंबीयांनी त्याचा शोध सुरू केला. सोसायटी परिसरात शोध घेत असताना लिफ्ट बंद असल्याचे रहिवाशांच्या लक्षात आले. त्यानंतर तातडीने सिंहगड रस्ता पोलिसांना आणि अग्निशमन दलाला माहिती देण्यात आली.

घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत लिफ्टचे दार तोडून शिवांशला बाहेर काढले. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. प्राथमिक माहितीनुसार, लिफ्टमध्ये हवा खेळती न राहणे आणि भीतीमुळे त्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, प्राथमिक तपासात लिफ्टमध्ये कोणताही मोठा तांत्रिक बिघाड आढळून आलेला नसल्याचे सांगितले जात आहे. संबंधित लिफ्टची देखभाल सोसायटीमार्फत केली जात असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर पुण्यातील बहुमजली इमारतींमधील लिफ्ट सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

या दुर्दैवी घटनेमुळे धूत कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

 

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!