Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Pune Police : पुणे विषारी दारूकांडात मोठी कारवाई; वरिष्ठ निरीक्षकांसह तीन पोलिस अधिकारी निलंबित

Pune Police : पुणे विषारी दारूकांडात मोठी कारवाई; वरिष्ठ निरीक्षकांसह तीन पोलिस अधिकारी निलंबित

Pune Police : पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये विषारी दारू प्राशनामुळे झालेल्या मृत्यूंच्या प्रकरणात मोठी प्रशासकीय कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणातील निष्काळजीपणाचा ठपका ठेवत हडपसर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय मोगले यांच्यासह तीन पोलिस अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्यात आले आहे. या निर्णयामुळे पुणे पोलिस दलात मोठी खळबळ उडाली आहे.

विषारी दारूकांडात आतापर्यंत १५ जणांचा मृत्यू झाला असून अनेकांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असताना ही कारवाई करण्यात आली. वरिष्ठ निरीक्षक संजय मोगले यांच्यासोबत सहायक पोलिस निरीक्षक हसीना सिकलगार आणि उपनिरीक्षक हसन मुलानी यांनाही निलंबित करण्यात आले आहे.

दरम्यान, उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी मृतांच्या कुटुंबीयांशी दूरध्वनीवरून संवाद साधला. घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी असून सरकार पीडितांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

या प्रकरणात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. राहुल क्षीरसागर नावाचा अवैध दारू विक्रेता देखील विषारी दारू पिऊन मृत्युमुखी पडल्याचे समोर आले आहे. हडपसर परिसरातील पांढरे मळा येथे तो अवैध दारूचा गुत्ता चालवत होता. विशेष म्हणजे, १३ मे रोजी त्याच्यावर हडपसर पोलिस ठाण्यात अवैध दारू विक्रीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाचा तपास गुन्हे अन्वेषण विभागाकडे (CID) सोपवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील विषारी दारूकांडाची सखोल चौकशी करण्यासाठी राज्य सरकार लवकरच मोठा निर्णय घेऊ शकते. या घटनेमुळे संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.

 

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!