Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

पुण्यात परिवहन विभागात मोठा भ्रष्टाचार; प्रमोशनसाठी बड्या अधिकाऱ्याने घेतली तब्बल ४० कोटींची लाच

पुण्यात परिवहन विभागात मोठा भ्रष्टाचार; प्रमोशनसाठी बड्या अधिकाऱ्याने घेतली तब्बल ४० कोटींची लाच

Pune Bribe News : राज्याच्या परिवहन विभागात मोठ्या भ्रष्टाचाराचा आरोप समोर आल्याने खळबळ उडाली आहे. अप्पर परिवहन आयुक्त भरत कळसकर यांच्यावर तब्बल ४० कोटी रुपयांची लाच घेतल्याचा गंभीर आरोप करण्यात आला असून, प्रमोशन प्रक्रियेत मोठ्या गैरव्यवहाराचा दावा करण्यात आला आहे.

प्रमोशनसाठी कोट्यवधींची वसुली?

मोटार वाहन निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB) आणि दहशतवादविरोधी पथकाकडे यासंदर्भात तक्रार दाखल केली आहे.

त्यांच्या तक्रारीनुसार, न्यायालयात आरोपपत्र दाखल असलेल्या काही ‘आरटीओ’ अधिकाऱ्यांना उपप्रादेशिक परिवहन अधिकारी (DYRTO) पदावर बसवण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैशांची देवाणघेवाण करण्यात आली. या प्रक्रियेत अप्पर परिवहन आयुक्त भरत कळसकर यांनी ४० कोटी रुपयांची लाच घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे.

कॉल रेकॉर्डिंग आणि आर्थिक व्यवहारांचे पुरावे

तक्रारदार गजेंद्र पाटील यांनी केवळ आरोप न करता काही पुरावेही सादर केल्याचा दावा केला आहे. संबंधित अधिकाऱ्यांचे कॉल रेकॉर्डिंग, आर्थिक व्यवहार आणि प्रमोशन प्रक्रियेची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. माध्यमांसमोर येत त्यांनी या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी केली.

‘शहरी नक्षलवाद्यांना निधी’चा गंभीर आरोप

या कथित भ्रष्टाचारातून जमा झालेला पैसा ‘शहरी नक्षलवाद्यांना’ आर्थिक मदत म्हणून वापरला जात असल्याचाही गंभीर आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. त्यामुळे हे प्रकरण केवळ आर्थिक गैरव्यवहारापुरते मर्यादित न राहता सुरक्षेच्या दृष्टीनेही संवेदनशील मानले जात आहे.

काही अधिकाऱ्यांची नावे समोर

तक्रारीमध्ये काही अधिकाऱ्यांची नावेही नमूद करण्यात आली आहेत. गंभीर गुन्हे दाखल असतानाही नियम धाब्यावर बसवून त्यांना प्रमोशन दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. श्रीकृष्ण नकाते, स्वप्नील माने आणि सिद्धार्थ ठोके या अधिकाऱ्यांची नावे चर्चेत आली आहेत.

परिवहन विभागावर प्रश्नचिन्ह

या संपूर्ण प्रकरणामुळे परिवहन विभागातील पारदर्शकता आणि प्रशासकीय प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. आता संबंधित यंत्रणा या आरोपांची कितपत गंभीर दखल घेते आणि चौकशी कोणत्या दिशेने जाते, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

 

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!