Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

रुपाली ठोंबरेंनी घेतली श्रीकांत शिंदेंची भेट; शिवसेनेच्या ऑफरबाबतही सांगितलं

रुपाली ठोंबरेंनी घेतली श्रीकांत शिंदेंची भेट; शिवसेनेच्या ऑफरबाबतही सांगितलं

पुणे : अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील पुण्याच्या महिला नेत्या रुपाली ठोंबरे पाटील (Rupali thombare patil) गेल्या काही महिन्यांपासून पक्षात नाराज असल्याची चर्चा आहे. सत्ताधारी पक्षात असूनही अपेक्षेप्रमाणे त्यांना जबाबदारी मिळाली असून याउलट पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यासोबत त्यांचे खटके उडाल्याने त्यांच्या पक्षांतराची चर्चा होत आहे. सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये नगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून पुढील महिन्यात महापालिका निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता रुपाली ठोंबरे यांनी आज शिवसेनेचे (Shivsena) नेते तथा खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant shinde) यांची भेट घेतली. या भेटीनंतर केलेल्या वक्तव्याने त्यांच्या शिवसेना पक्षप्रवेशाची चर्चा होत आहे.

रुपाली पाटील यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांची मुंबईत भेट घेतल्यानंतर व्हिडिओच्या माध्यमातून संवाद साधला. शिवसेनेने जर मला ऑफर दिली तर मी विचार करेन, असे म्हणत त्यांनी स्पष्टपणे पक्षबदलाचे संकेत दिले आहेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या राहिलेल्या रुपाली पाटील शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू आहे. रूपाली पाटील गेल्या काही दिवसांपासून अजित पवारांच्या राष्ट्रवादीत नाराज आहेत, त्यातच काही दिवसांपूर्वी त्यांच्याकडून प्रवक्ते पदाची जबाबदारीही काढून घेण्यात आल्याने त्यांच्या नाराजीत अधिकच भर पडली.

त्यामुळे, त्या शिवसेनेत प्रवेश करतील अशी चर्चा असून त्यांनी आज श्रीकांत शिंदे यांची मुंबईत भेट घेतली. मी महायुतीतील घटक पक्ष म्हणून, कामानिमित्त श्रीकांत शिंदे यांना भेटले, माझ्यासोबत काँग्रेसच्या संगिता तिवारी आणि शिंदे गटाच्या शर्मिष्ठा येवले देखील यावेळी उपस्थित होत्या. मात्र, आपली भेट राजकीय नसल्याचे त्यांनी म्हटले. पण, काम करणाऱ्या कार्यकर्तीला काही ऑफर दिल्यास नक्कीच विचार करेन, असेही त्यांनी स्पष्ट केले.

रुपाली ठोंबरेंना पक्षाकडून नोटीस
दरम्यान, महिला आयोगाच्या अध्यक्षा तथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर टीका केल्यामुळे पक्षाकडून अलीकडेच रुपाली ठोंबरे पाटील यांना पक्षशिस्तीचा भंग केल्याप्रकरणी कारणे दाखवा नोटीस पाठण्यात आली होती. या नोटीसला रुपाली ठोंबरे पाटील यांनी रितसर पद्धतीने पत्र पाठवून उत्तर दिले आहे. मी कुठेही पक्षशिस्तीचा भंग केलेला नाही. फलटणमधील डॉक्टर तरुणीच्या मृत्यूसंदर्भात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांच्या मताशी मी सहमत नाही, हे माझे मत मी मांडले होते.

मला पक्षाने खुलासा पत्र मागितलं होते. राज्य महिला आयोग आणि प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्याबद्दल वक्तव्य केल्याबद्दल मी खुलासा दिला आहे. मी राज्य महिला आयोगाबद्दल बोलले आहे, प्रदेशाध्यक्षाबद्दल बोलले आहे. फलटण प्रकरणावर त्या जे काही बोलल्या त्यामुळे महाराष्ट्रभर असंतोष निर्माण झाला. मी कोणाबद्दल वाईट वक्तव्य केलेले नाही. मला पक्षाकडून नोटीस का देण्यात आली, मला याची कल्पना नाही, असे रुपाली ठोंबरे पाटील यांनी उत्तरादाखल म्हटले होते.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!