Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

रुपाली ठोंबरेंचं मोठं वक्तव्य! राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राजीनाम्याच्या तयारीत, पोलीसांसह सरकारचं काम समोर आणण्याचा इशारा

रुपाली ठोंबरेंचं मोठं वक्तव्य! राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राजीनाम्याच्या तयारीत, पोलीसांसह सरकारचं काम समोर आणण्याचा इशारा

Rupali Thombre: पुण्यातून अत्यंत महत्वाची राजकीय घडामोड समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देते असं वक्तव्य त्यांनी केलं आहे. राजीनामा दिल्यानंतर पोलीस आणि हे सरकार कसं काम करतं हे सगळ्यांच्या समोर आणणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. महिला आयोगा प्रमाणेच पोलीस देखील काम करायला लागले आहेत, असे रुपाली ठोंबरे म्हणाल्या.

रूपाली ठोंबरे पाटील यांच्या बहिणीसह चार जणांविरुद्ध खडक पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. माधवी खंडाळकर यांनी खडक पोलीस स्टेशनमध्ये येऊन तक्रार दिल्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रुपाली पाटील खडक पोलीस स्टेशनमध्ये दाखल होत पोलिसांना जाब विचारत आहेत. गुन्हा कसा दाखल केला? असा सवाल रुपाली ठोंबरे यांनी केला आहे. पुण्यामध्ये नसतानाही रुपाली ठोंबरे यांच्यावरती गुन्हा दाखल केल्याने त्या आक्रमक झाल्या आहेत. पोलिसांवर राजकीय दबाव असल्याने माझ्यावर चिखल उडवण्यात आला आहे असा आरोप रुपाली ठोंबरे पाटील यांनी केला आहे. अजूनही रुपाली ठोंबरे पाटील पुण्यातील खडक पोलीस स्टेशनमध्ये बसून आहेत. त्यांची सध्या वरिष्ठ पोलिसांची चर्चा सुरु आहे.

नेमकं प्रकरण काय?

पुण्यातील माधवी खंडाळकर या महिलेने फेसबुक लाईव्ह करुन रुपाली ठोंबरे यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर हा वाद अधिकच टोकाला केल्याचं दिसून येतं. रुपाली ठोंबरे पाटील यांनी गुंड पाठवून मारहाण करण्यात आल्याचा दावा एका महिलेने केला होता, याबाबतचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. गुंड पाठवून अमानुषपणे मारहाण केल्याचा आरोप या महिलेने केला होता. मारहाणीनंतर ही महिला रक्तबंबाळ झाल्याचं व्हिडीओमध्ये दिसून येत होतं. रूपाली ठोंबरे पाटील यांच्या विरोधात पोस्ट केल्याने मारहाण केल्याचा आरोप त्या महिलेने केला होता. माधवी खंडाळकर असं या महिलेचं नाव आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!