Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

इंदापूरचे ज्येष्ठ पत्रकार सुरेश अनंतराव जकाते यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन

इंदापूरचे ज्येष्ठ पत्रकार सुरेश अनंतराव जकाते यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन

इंदापूर : प्रतिनिधी

इंदापूर शहरातील ज्येष्ठ पत्रकार तसेच अनेक वर्षे वृत्तपत्र विक्रेते म्हणून कार्यरत असलेले सुरेश अनंतराव जकाते यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले आहे. वयाच्या 56 वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने इंदापूर तालुक्यात पत्रकारिता क्षेत्रासह सर्व समाजघटकांत हळहळ व्यक्त केली जात आहे.

३५ वर्षांहून अधिक काळ पत्रकारितेत

‌सुरेश जकाते यांनी तब्बल ३५ वर्षांहून अधिक काळ पत्रकारिता आणि वृत्तपत्र विक्री या दोन्ही क्षेत्रांत सातत्यपूर्ण कार्य करून आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांनी विविध प्रमुख वृत्तपत्रांसाठी बातमीदार म्हणून जबाबदारी पार पाडली.त्यांच्या साधेपणामुळे, कामातील निष्ठेमुळे आणि बातमी संकलनातील अचूकतेमुळे ते नेहमीच सहकाऱ्यांमध्ये लोकप्रिय होते.

त्यांच्या पश्चात परिवार

त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुली, एक मुलगा, जावई व नात असा परिवार आहे. सुरेश जकाते यांच्या निधनामुळे इंदापूर तालुक्यातील पत्रकारितेतील अष्टपैलू व्यक्तिमत्त्व हरपल्याची भावना पत्रकार बांधवांनी व्यक्त केली आहे.तसेच विविध राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी जकाते यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!