Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

विधानसभेला भोसरीत, आता इंदापूरच्या यादीत नाव; इच्छुक पती-पत्नीचे नाव गेले दुसरीकडे

विधानसभेला भोसरीत, आता इंदापूरच्या यादीत नाव; इच्छुक पती-पत्नीचे नाव गेले दुसरीकडे

पिंपरी: गतवर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत भोसरी मतदारसंघात मतदान केलेले असताना, तसेच आगामी महापालिका निवडणुकीसाठी इच्छूक असलेल्या पती-पत्नीचे नाव दुसरीकडे टाकण्याचा प्रकार पुढे आला आहे. त्यांची नावे भोसरी विधानसभेतून वगळून थेट इंदापूर आणि बारामतीमध्ये गेल्याने महापालिका निवडणुकीच्या रिंगणातूनच त्यांचा पत्ता कट झाला आहे. यावरून गंभीर आक्षेप नोंदवत जाणीवपूर्वक केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) युवक शहराध्यक्ष इमान शेख यांच्या आई-वडिलांच्या नावांबाबत हा प्रकार घडला आहे. या संदर्भात त्यांनी पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक विभाग व राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, आगामी महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग ८ मधून माझे वडील युनूस शेख आणि प्रभाग क्रमांक 9 मधून माझी आई राबिया शेख इच्छुक आहेत. दोघांपैकी एकाला पक्षाकडून उमेदवारी दिली जाणार होती.

दरम्यान, प्रभागनिहाय मतदार याद्या तयार करताना असंख्य घोळ झाले आहेत. त्यापैकी एक गंभीर प्रकार आमच्या निदर्शनास आला आहे. आई राबिया यांचे मतदान बारामती विधानसभेतील शिरसुफळ येथे गेले आहे. तर वडील युनूस शेख यांचे मतदान इंदापूर विधानसभेत टाकले गेले आहे. मागील ३५ वर्षापासून आमचे कुटुंब पिंपरी-चिंचवडमध्ये आहे. आम्ही पत्ता बदल करण्यासाठी कोणताही अर्ज केलेला नाही. मात्र, परस्पर त्यांचे मतदान बारामती व इंदापूर मतदारसंघात टाकले आहेत. त्यामुळे इच्छूक असून देखील आई-वडिलांना पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक लढता येणार नसल्याचे शेख यांनी म्हटले आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!