Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

शिरूर-हवेली ठरणार राज्यासाठी ‘रोल मॉडेल’; वाहतूक कोंडीमुक्तीसाठी हजारो कोटींच्या निधीसह आमदार माऊली आबा कटके यांच्या प्रयत्नांना यश

शिरूर-हवेली ठरणार राज्यासाठी ‘रोल मॉडेल’; वाहतूक कोंडीमुक्तीसाठी हजारो कोटींच्या निधीसह आमदार माऊली आबा कटके यांच्या प्रयत्नांना यश

Pune-Shirur Elevated Corridor : शिरूर-हवेली मतदारसंघातील जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी आमदार ज्ञानेश्वर (माऊली आबा) कटके यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला ऐतिहासिक यश मिळाले आहे. पुणे शहरालगतच्या वाघोली, शिक्रापूर आणि लोणीकाळभोर यांसारख्या वेगाने वाढणाऱ्या भागात दररोज होणाऱ्या कोंडीतून नागरिकांची सुटका करण्यासाठी राज्य व केंद्र सरकारने हजारो कोटी रुपयांच्या विकासकामांना मंजुरी दिली आहे. २०२४ मध्ये आमदार म्हणून निवडून आल्यापासून माऊली आबांनी या प्रश्नावर प्रशासकीय आणि शासन स्तरावर विशेष लक्ष केंद्रित केले होते.

उन्नत मार्ग आणि फ्लायओव्हर्ससाठी निधीचा पाऊस
मतदारसंघातील प्रमुख महामार्गांचे स्वरूप बदलण्यासाठी सरकारने भरघोस निधी मंजूर केला आहे. यामध्ये पुणे ते शिरूर उन्नत मार्गासाठी ७,३५० कोटी रुपये, तर हडपसर ते यवत (सोलापूर रस्ता) उन्नत मार्गासाठी ६,५०० कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. याशिवाय औद्योगिक पट्ट्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या चाकण-शिक्रापूर उन्नत मार्गालाही ६,१५० कोटींची मान्यता मिळाली आहे. या प्रकल्पांमुळे शिक्रापूर आणि वाघोली परिसरातील तासनतास चालणाऱ्या कोंडीतून कामगार, विद्यार्थी आणि व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

मेट्रो जाळ्याचा विस्तार: वाघोली आणि लोणीकाळभोरला जोडणार
वाहतुकीचा आधुनिक पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी आमदार कटके यांनी मेट्रो प्रकल्पासाठीही विशेष प्रयत्न केले आहेत. वाघोली मेट्रो प्रकल्पासाठी सुमारे ३,५०० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून, हडपसर ते लोणीकाळभोर या मेट्रो मार्गालाही हिरवा कंदील मिळाला आहे. सोलापूर महामार्गावरील वाढती लोकसंख्या आणि वाहतूक लक्षात घेता हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. या सर्व प्रकल्पांची प्रशासकीय प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात असून, लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.

“नागरिकांचा त्रास कमी करणे हाच माझा उद्देश” – आमदार ज्ञानेश्वर कटके
या यशाबद्दल बोलताना आमदार ज्ञानेश्वर कटके म्हणाले की, “वाहतूक कोंडीमुळे नागरिकांचा वेळ आणि इंधन वाया जात होते. प्रकल्प मंजूर होणे हा पहिला टप्पा असून, हे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी मी सातत्याने पाठपुरावा करत राहीन.” पुढील दोन वर्षांत हे प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन असून, यामुळे केवळ वाहतूकच सुलभ होणार नाही, तर शिरूर-हवेलीतील उद्योग आणि रोजगारालाही मोठी चालना मिळणार आहे. या विकासकामांच्या निर्णयामुळे संपूर्ण मतदारसंघात आनंदाचे वातावरण आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!