Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

मोठी बातमी..! बारामतीसह ‘या’ तीन नगरपरिषदांच्या निवडणुकीला अचानक ब्रेक, कोर्टाचा महत्त्वाचा आदेश

मोठी बातमी..! बारामतीसह ‘या’ तीन नगरपरिषदांच्या निवडणुकीला अचानक ब्रेक, कोर्टाचा महत्त्वाचा आदेश

Nagarparishad Election : महाराष्ट्रातील नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांसाठी आज दुपारी ५ वाजता प्रचार थांबणार असून मंगळवारी (२ डिसेंबर) मतदान होणार होते. मात्र मतदानापूर्वी काही तासांतच मोठी बातमी समोर आली आहे. राज्य निवडणूक आयोगाने बारामती, फलटण आणि महाबळेश्वर या तीन नगरपरिषदांच्या निवडणुका पुढे ढकलल्या आहेत.

आता फलटण आणि महाबळेश्वर येथील मतदानप्रक्रिया अनुक्रमे 20 आणि 21 डिसेंबर रोजी पार पडेल. जिल्हा न्यायालय निवडणूक प्रक्रियेबाबत याचिका दाखल करण्यात आली होती. त्यामुळे जिल्हा न्यायालयाने निकाल देण्यासाठी आठ दिवसांचा कालावधी घेतला आहे.

बारामतीत नेमके काय घडले?

-उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत दुपारी ३ वाजेपर्यंत होती, पण प्रत्यक्षात पावणे तीन वाजताच प्रक्रिया बंद करण्यात आली होती.
– भाजपच्या दोन उमेदवारांना मुदत संपल्यानंतरही अर्ज भरण्याची परवानगी न्यायालयाने दिली होती.
– नगराध्यक्षपदाच्या उमेदवारासह सात प्रभागांतील उमेदवारांविरुद्ध बारामती सत्र न्यायालयात याचिका दाखल झाल्या होत्या.
– सत्र न्यायालयाने या याचिका फेटाळल्या, मात्र अपीलाची मुदत संपलेली नसल्याने व नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वानुसार निवडणूक आयोगाने संपूर्ण प्रक्रिया पुढे ढकलली.

बारामतीसाठी नवीन वेळापत्रक (४ डिसेंबर रोजी जाहीर होणार)

– नवीन निवडणूक कार्यक्रम : ४ डिसेंबर २०२५
– उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख : १० डिसेंबर दुपारी ३ वाजेपर्यंत
– निवडणूक चिन्ह वाटप व अंतिम यादी : ११ डिसेंबर २०२५
– मतदान : २० डिसेंबर २०२५ (सकाळ ७.३० ते सायं. ५.३०)
– मतमोजणी व निकाल : २१ डिसेंबर २०२५

बारामतीत नव्याने उमेदवारी अर्ज दाखल करता येणार नाहीत; फक्त आधीच्या याचिकांशी संबंधित नगराध्यक्षपद व सात जागांसाठीच निवडणूक पुढे ढकलली आहे. उर्वरित प्रभागांतील निवडणूक कार्यक्रम जैसे थे राहील, असे प्राथमिक माहितीत समजते. या निर्णयामुळे बारामतीतील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!